power shortage sakal
पिंपरी-चिंचवड

Power shortage: आंदर मावळातील ५० गावांना विजेचा ‘झटका’

सकाळ डिजिटल टीम

Pimpri- Chinchwad: आंदर मावळमधील 50 ते 60 गावांना अनेक वर्षांपासून विजेची समस्या नेहमीच जाणवत आहे. टाकवे बुद्रुकपासून 35 किमी अंतरावरील शेवटचे टोक सावळा, खांडी, निळशी, कळकराई या भागांपर्यंत वरचेवर ‘बत्ती गुल’ असते. वीज गायब झाल्यानंतर काही गावांमध्ये अक्षरशः दहा ते पंधरा दिवसांनंतर वीजपुरवठा पूर्ववत होत आहे. परिणामी याचा फटका विद्यार्थी, बागायतदार, शेतकरी, गृहिणी, कामगारवर्ग यांना बसतो.

विजेअभावी निरनिराळ्या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा पंप देखील बंद राहतात. त्यामुळे, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या भागातील 50 ते 60 गावांची विजेच्या संदर्भात असणाऱ्या समस्येची दखल घेत टाकवे बुद्रुकचे माजी उपसरपंच रोहिदास असवले यांनी वडगाव येथील महावितरण विभागाला निवेदन दिले आहे.

टाटा, इनरकॉड विंडची वीज द्यावी

आंदर मावळमधील ठोकळवाडी धरण (टाटा कंपनी) व व पवन चक्कीद्वारे (इनरकॉन विंड पॉवर कंपनी) निर्माण होणारी वीज मुंबईमधील काही भागांना दिली जाते. त्यामधील आंदर मावळला जेवढी विजेची आवश्यकता आहे. त्या प्रमाणात या भागांतील गावांना मिळावी. कारण, आंदर मावळमधील 50 ते 60 गावांना तळेगाव दाभाडे येथील पॉवर हाऊसवरून वीजपुरवठा होतो. हे अंतर 60 किमीपेक्षा जास्त आहे.

ही वीज वाहिनी जीर्ण झाल्याने नेहमी वारंवार वीज पुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे आंदर मावळातील अनेक गावांना आठ ते दहा दिवस वीज वाहिनी दुरूस्त होईपर्यंत अंधारात राहावे लागते. म्हणून आंदर मावळातील गावांना टाटा कंपनी व इनरकॉन विंड पॉवर कंपनी यांच्याकडून वीजपुरवठा केला जावा, अशी प्रमुख मागणी असवले यांनी केली आहे.

माझा दूध डेअरीचा व्यवसाय आहे. त्यामुळे दुधापासून तयार होणारे सर्वच पदार्थ शीतपेटीमध्ये ठेवावे लागतात. मात्र, नेहमीच वीज जात असल्यामुळे अनेकवेळा दुग्धजन्य पदार्थ खराब होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊन मोठ्या प्रमाणावर भुर्दंड सहन करावा लागतो.

- दिगंबर आगिवले, व्यावसायिक

शालेय शिक्षण घेत असताना रात्रीच्या व पहाटेच्यावेळी विजेची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. वीज सारखी जात असते. कधी-कधी पाच ते सहा दिवस वीज येत नाहीत. त्यामुळे, शाळेतील अभ्यास पूर्ण करता येत नाही. संबंधित विभागाने आमच्या शिक्षणाची दखल घेऊन आमची विजेची नेहमीची असणारी समस्या सोडवावी.

- दीक्षा खांडभोर, विद्यार्थिनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT