PMRDA Flats sakal
पिंपरी-चिंचवड

PMRDA Home : पीएमआरडीएच्या सदनिकांच्या वाढणार किमती? नव्‍याने किमती वाढविण्याबाबत आयुक्‍तांनी घेतला आढावा

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) गृहप्रकल्‍पातील सदनिकांच्‍या किमती वाढविण्याबाबत विचार करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) गृहप्रकल्‍पातील सदनिकांच्‍या किमती वाढविण्याबाबत विचार करत आहे. सध्याच्‍या किंमती बारा वर्षांपूर्वी निश्‍चित करण्यात आल्‍या होत्‍या. त्‍यामुळे, आता नव्‍याने किमती वाढविण्याबाबत आयुक्‍तांनी आढावा घेतला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांकडे किमती वाढविण्याबाबत माहिती मागविली आहे. तसा निर्णय झाल्‍यास सदनिकांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. मात्र, याबाबत अद्याप तरी निर्णय झाला नसल्‍याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.

प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहयोजना आणि पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी जुलै महिना अखेरपर्यंत सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ती होऊ शकली नाही. दरम्यान, म्हाडा प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार देखील केला होता. त्यामुळे, या घरांची सोडत लवकर काढली जाईल, अशी अपेक्षा होती. घरांची सोडत लवकर व्हावी, यासाठी काही नागरिकांनी देखील प्राधिकरणाकडे विचारणा केली होती.

रिकाम्या घरांसाठी सोडत

वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० व ३२ येथे पीएमआरडीएच्या वतीने ७९२ घरांचा प्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांसाठी ३७८ वन रुम किचन सदनिका साकारण्यात आल्या आहेत. तर अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी ४१४ वन बीएचके सदनिका आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेमधील पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे उभारण्यात आली. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ३ हजार ३१७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ५६६ सदनिका आहेत. दरम्यान, तेथील जवळपास साडेपाचशे घरे रिकामी आहेत. त्यासाठी देखील नव्याने सोडत काढली जाणार आहे. यातून देखील घरे शिल्लक राहिल्यास ती सर्वांसाठी खुली राहणार आहेत.

पहिले येतील त्यास घरे उपलब्ध करून देण्यात येतील. याचबरोबर दोन्ही ठिकाणी २३ दुकाने देखील शिल्लक आहेत. सदनिकासमवेत ही दुकाने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२२ दरम्यान सोडत काढली होती. त्यानंतर अद्याप ही घरे रिकामी आहेत. त्यामुळे, आता या सदनिकांच्‍या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा अहवाल आयुक्तांनी मागविला आहे.

सदनिकांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. या गृहप्रकल्पांतील सदनिकांच्या किंमती २०१२-१३ मध्ये ठरलेल्या आहेत. सद्यःस्थितीमध्ये त्यांच्या किंमती वाढविण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. वाढीव दराबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

पेठ क्र. ३० आणि ३२ मधील सदनिकांची किंमत

घर - किंमत

  • वन आरके - १९ लाख

  • वन बीएचके - २५ लाख ५० हजार

पेठ क्र. १२ मधील सदनिकांची किंमत

घर - किंमत

  • वन बीएचके - ७ लाख ४० हजार

  • टू बीएचके - ३२ लाख ५९२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT