BRT Route sakal
पिंपरी-चिंचवड

BRT Route : बसचालकांचा गोंधळ! बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहने सुसाट

पिंपरी शहरात निगडी ते दापोडी, किवळे ते सांगवी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता आदी मार्गांवर बीआरटी मार्गिका आहे.

मंगेश पांडे

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससाठी स्वतंत्ररीत्या बनविण्यात आलेल्या बीआरटी मार्गिकेतून इतर खासगी वाहनांना मनाई असतानाही अनेक खासगी वाहने नियम पायदळी तुडवून या मार्गिकेतून सुसाट जातात. यामुळे बसचालकांचा गोंधळ उडत असून, अपघाताच्या घटनाही वाढत आहेत.

शहरात निगडी ते दापोडी, किवळे ते सांगवी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता आदी मार्गांवर बीआरटी मार्गिका आहे. प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी या मार्गिका सुरू केल्या आहेत. यामधून पीएमपी बस तसेच अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता इतर वाहनांना प्रवेश नाही. तरीही अनेक खासगी वाहन चालक यामध्ये वाहन घुसडतात. यामुळे बसला अडथळा निर्माण होतो. बसथांब्यावर प्रवासी घेण्यासाठी व सोडण्यासाठी थांबताना समोर खासगी वाहन असल्यास अडचण निर्माण होते.

खासगी वाहनांसाठी इतर रस्ते असतानाही थोडे लवकर जाण्यासाठी अथवा इतर वाहनांच्या पुढे निघण्यासाठी या मार्गिकेत वाहनचालक येतात. अनेकदा ही वाहने पीएमपी बसची वाट अडवितात.

मारावा लागतो ब्रेक

या मार्गिकेतून बस जात असताना एखादे वाहन अचानक मध्ये आल्यास बसचालकाला अर्जंट ब्रेक मारावा लागतो.

यामुळे बसमधील उभे असलेले प्रवासी अक्षरशः कोसळतात. इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो. तरीही बेशिस्त खासगी वाहनचालक याच मार्गिकेतून वाहन घुसडतात. बीआरटी मार्गिकेतून वाहन घुसडणाऱ्या चालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. निगडी-दापोडी मार्गावरील काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट पूल, मोरवाडी चौक आदी ठिकाणी वेळोवेळी कारवाई केली जात असते. तरीही काही चालक बेशिस्तपणाने वागतात.

बीआरटी मार्गिकेतून खासगी वाहन नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तरीही या मार्गिकेत वाहन घुसडविणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी पॉइंट लावण्यात आलेले आहेत. नागरिकांनी इतर रस्त्यांचा वापर करणे आवश्यक आहे.

- सुनील पिंजण, पोलिस निरीक्षक, नियोजन विभाग, वाहतूक शाखा

बीआरटी मार्गिकेतून बस पुढे नेण्याकडे आमचे पूर्ण लक्ष असते. अशावेळी अचानक खासगी वाहन पुढे आल्यास गोंधळ उडतो. अचानक ब्रेक मारावा लागतो. थांब्यावरही बस थांबवताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे खासगी वाहनचालकांनी या मार्गिकेतून प्रवास करणे टाळावे.

- राहुल खारे, पीएमपी बसचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT