Property Statement Through QR Code sakal
पिंपरी-चिंचवड

Property Statement : ‘क्यूआर कोड’द्वारे मालमत्ता विवरण; सर्वेक्षण अन् करआकारणी पद्धती जाहीर

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील नवीन, वाढीव आणि वापरात बदल झालेल्या मालमत्तांचे सर्वेक्षण अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून महापालिकेने सुरू केले आहे. यामुळे मालमत्तांची अचूक माहिती आणि करयोग्य मूल्य निश्चित केले जाणार आहे. त्याची नोटीस ई-मेल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे दिली जाणार आहे.

त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मालमत्ता धारकांना मालमत्तेचा नकाशा, विवरण, मूल्यांकन, देय बिलाची रक्कम असा तपशील दिसेल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

महापालिका कर आकारणी व कर संकलन विभागाकडून इमारत व जमिनीवर मालमत्ता कराची आकारणी आणि वसुली केली जात आहे. त्यानुसार कर कक्षेत नसलेल्या मालमत्तांना कर कक्षेत आणण्यासाठी स्थापत्य कन्सल्टंट कंपनीमार्फत ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. यात नवीन, वाढीव, वापरात बदल अशा मालमत्तांचा शोध घेतला जात आहे.

या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपद्धती निश्चित केली आहे. अशा इमारती, मोकळ्या जमिनींना सुलभ व सलग क्रमांक देण्यात येणार आहेत. सर्व मालमत्तांची अंतर्गत बिनचूक मोजमाप होणार आहे. मालमत्तेचे चटई क्षेत्र (कारपेट) घेण्यात येणार आहे. त्यावर २० टक्के बिल्टअप आकारले जाणार आहे.

करआकारणी हरकतींवर सुनावणी

विशेष नोटीसवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मालमत्ताधारकास मालमत्तेचे विवरण दिसेल. यानंतर मालमत्ता मालक, भोगवटादारांना लेखी व ऑनलाइन हरकत घेता येईल. त्यासाठी मोबाईलवर ओटीपी बेस सुविधा उपलब्ध आहे. त्याची माहिती मालमत्ता कर सॉफ्टवेअरमध्ये संकलित केली जाईल.

करविवरण पाहून आकारणी योग्य किंवा अयोग्य कराबाबतची खातरजमा करता येईल. हरकत दाखल झाल्यानंतर बाजू मांडण्यासाठी सुनावणी होईल. त्यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांसह सहाय्यक मंडलाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुनावणीनंतर आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी करून करयोग्य मूल्य निश्चित केले जाईल.

मालमत्तांचे करयोग्य मूल्यांकन पद्धती

  • सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन मालमत्तांच्या कर आकारणीसाठी मालकी हक्क, बांधकाम पूर्णत्व, भोगवटा संबंधीची कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास संबंधित मालमत्तेचे मालक, भोगवटादारांना महापालिका अधिनियमाप्रमाणे कागदपत्रे मागणीपत्र सादर करावे लागतील.

  • आकारणी न झालेल्या नवीन, वाढीव, वापरात बदल असलेल्या मालमत्तांचे करयोग्य निश्चिती करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या दरपत्रकानुसार बांधकाम दर्जा, क्षेत्रफळ, वापर, बांधकाम प्रकार विचारात घेऊन मालमत्तेच्या करयोग्य मूल्याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.

  • यापूर्वी आकारणी झालेल्या मालमत्तांच्या करयोग्य मूल्यात कोणताही बदल होणार नाही.

  • कर आकारणीसाठी बांधकाम कधी झाले, याबाबत सबळ पुराव्याची कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. मात्र, कागदपत्रे उपलब्ध नसल्यास नियमानुसार जास्तीत जास्त सहा वर्षे मागे जाऊन कर आकारणी केली जाणार आहे.

  • मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत कागदपत्रानुसार मालक, भोगवटादारांचे नाव नोंदवावे. मात्र, कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास सद्यःस्थितीत भोगवटा करीत असलेल्या भोगवटादाराच्या ‘धारक’ नावाने आकारणी केली जाणार आहे.

  • मालमत्ता कर आकारणीची विशेष नोटीस, तसेच मोठ्या निवासी मालमत्तेस फलोरेज कर नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर करयोग्य मूल्य विभागीय कार्यालय स्तरावर निश्चित करून कर आकारणीची विशेष नोटीस तयार केली जाणार आहे.

मालमत्ता करआकारणी पद्धती

  • मालमत्तेची मोजमापे चौरस मीटर पद्धतीने होत आहे

  • कर आकारणीसाठी मालमत्तेचा बांधकाम दर्जा, वापर, क्षेत्रफळ विचारात घेतला जात आहे

  • मालमत्ता अधिकृत किंवा अनधिकृत आहे, याचीही माहिती घेतली जात आहे

  • सामान्य कर सवलतीच्या माहितीचे संकलन, मालमत्तांची विवरणपत्रात माहिती भरून घेण्यात येत आहे

  • विवरण पत्रावर मालमत्तेचे मालक, भोगवटादार, प्रतिनिधींची स्वाक्षरी घेतली जात आहे, स्वाक्षरीस नकार दिल्यास, नमूद केले जात आहे

करआकारणी मान्य असल्यास...

मालमत्ताधारकास नोटीसमधील आकारणी मान्य असल्यास पत्राद्वारे किंवा ऑनलाइन पद्धतीने संमती देता येईल. त्यानंतर मालमत्ता धारकास करयोग्य मूल्य निश्चिती आदेशाची विशेष नोटीस समक्ष अथवा ऑनलाइन दिली जाईल. मालमत्ताधारकास नोटीसवर हरकत, करयोग्य मूल्य निश्चिती आदेश, मालमत्ता कर बिल, कर भरणा इत्यादी मालमत्ता कराच्या अनुषंगाने सुविधेचा लाभ घेता येईल. करयोग्य मूल्य निश्चित झाल्यास विशेष नोटीस दोन आणि तीनची असेसमेंट रजिस्टरला नोंद होईल. हे रजिस्टर ऑनलाइन असेल. करयोग्य मूल्य निश्चितीनंतर मालमत्ताधारकास समक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने बिल मिळेल.

नव्याने आढळणाऱ्या मालमत्तांसाठी कर आकारणीची कार्यपद्धती जाहीर केली आहे. यामध्ये गेल्या सहा वर्षांपासून मालमत्ताधारकांना कराची आकारणी केली जाणार आहे. मात्र, मालमत्ता कधी उभारली, याची योग्य कागदपत्रे सादर केल्यास तेव्हापासूनच कराची आकारणी केली जाणार आहे.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT