पिंपरी-चिंचवड

अखेर वेदिकावर उपचार होणार सुरु;दुर्मिळ लशीसाठी १६ कोटी रुपये जमा

केंद्र सरकार व राज्य सरकारने लसीवरील आयात शुल्क केले माफ

सकाळ वृत्तसेवा

अवघ्या ७७ दिवसात वेदिकासाठी जमा झाले तब्बल १६ कोटी रुपये

केंद्र सरकार व राज्य सरकारने लसीवरील आयात शुल्क केले माफ

येत्या दहा बारा दिवसांमध्ये लस होणार उपलब्ध

पिंपरी : अवघ्या ८ महिन्यांची असताना वेदिकाला SMA Type -1 या दुर्धर आजाराचे निदान झाले आणि तिच्या आई वडिलांच्या पाया खालची जमीनच सरकली. या आजारासाठी देण्यात येणाऱ्या ( Zolgensma ) लसीची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आणि आयात शुल्क वेगळे, ही लस देण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही असे डॉक्टरांनी सांगून टाकले आणि मग सुरू झाला १६ कोटी रुपये जमा करण्याचा खडतर व अवघड असा प्रवास. (Pune Couple Raise 16 crore in just 77 days to Save Daughter Vedika who is suffering from a Zolgensma)

एवढी रक्‍कम कुठून आणणार असा प्रश्‍न पालकांसमोर उपस्थित होता. पालकांनी नागरिकांना आवाहन केले आणि समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. वेदिका अकरा महिन्यांची होण्यापूर्वीच नागरिकांच्या सहाय्याने तब्बल १६ कोटी रुपये जमा झाले. तिच्या पालकांनी केलेल्या विनंती नुसार केंद्र व राज्यसरकारने देखील आयात शुल्क माफ केला आहे.

आता प्रतीक्षा आहे ती अमेरिकेहून लस येण्याची. कारण लस आल्यानंतरच वेदिकावर उपचार केले जाणार आहेत. यामुळे हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका त्या भीषण आजारावर मात करणार हे नक्की झाले आहे.या लसीवरील आयात शुल्क माफ करण्या करिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेवुन सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली. तर या कामासाठी मराठी अभिनेता निलेश दिवेकर यांचे खूप सहकार्य झाल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकावर उपचार सुरु आहेत. वेदिकाला आवश्‍यक असलेल्या आर्थिक मदतीची गरज आता पूर्ण झाली आहे. रुग्णालयाच्या वतीने अमेरिकेतील लसनिर्मिती कंपनीकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या दहा बारा दिवसांत ही लस रुग्णालयात उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकाला ही लस दिली जाईल.

भारतासह जगभरातील पंधरा देशातील एकूण दीड लाख दानशूर व्यक्तीने मदत केल्याने वेदिकासाठी ही मदत मिळू शकली. वेदिकाच्या उपचारासाठी 16 कोटी रुपयांची रक्कम जमवण्यासाठी 77 दिवस लागले.

''या लसीवरील आयात शुल्क माफ करण्याकरिता वेदिकाचे वडील सौरभ शिंदे व खा. डॉ अमोल कोल्हे यांनी राज्याच्या आरोग्य भवन विभागाशी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्याशी पत्रव्यववहार केला होता. याची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारने आयातशुल्क व कर माफ केले आहे'' अशी माहिती वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी दिली. तर या कामासाठी माजी आ. विलास लांडे व मराठी अभिनेता निलेश दिवेकर यांचे खूप सहकार्य झाल्याचे शिंदे यांनी आवर्जून सांगितले

वेदिकाच्या पालकांनी मानले जनतेचे आभार !

आपल्या सर्वांच्या मदतीमुळे माझ्या चिमुकलीला जीवदान मिळणार आहे. या लसीच्या मदतीने वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू शकते. आमची तळमळ बघता समाजातील तळागाळातून मदतीचा ओघ सुरू झाला. आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपापल्या परीने जितकी होईल तितकी मदत समाज माध्यमातून केली गेली या साठी सर्वांचे शतशः आभार..!! अशा भावना वेदिकाचे आई वडील स्नेहा व सौरभ शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT