Pune Crime esakal
पिंपरी-चिंचवड

Pune Crime : माण सरपंचाच्या पतीवर सद्स्याने केला जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : आयटी नगरी माण (ता. मुळशी) गावच्या सरपंचपदाचा राजिनामा द्यावा म्हणून माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने इतर पंधरा साथीदारांसह सरपंच अर्चना आढावा यांचे पती सचिन आढाव यांच्या मोटारीवर दगड व सिमेंटचे ब्लॉक घालून जीवघेणा हल्ला चढविला यात आढाव गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता. ३०) पहाटे सव्वा एकच्या सुमारास माण देवी मंदिरा समोरील मुख्य चौकात घडली.

सचिन मच्छिंद्र आढाव (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणचा माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रवी बोडके याच्यासह, राज बहिरट, प्रदिप पारखी, सोन्या बोडके (सर्वजण रा. माणगाव ता. मूळशी) यांच्यासह अन्य दहा ते बारा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडून चार दिवस उलटत आले तरी पोलिसांना केवळ एका आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

यातील रवी बोडके हा सराईत गुन्हेगार असून या पूर्वी त्याच्यावर हिंजवडी व पौड ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे आयटी नगरीतील गावचे प्रथम व प्रमुख नागरिक असलेल्या सरपंचाचे कुटुंबच सुखी नसेल तर सर्व सामान्यांची काय व्यथा असा नाराजीचा सूर नागरिकांत ऐकायला मिळत आहे. याबाबत माहिती अशी, आढाव यांना रविवारी मध्यरात्री चर्चा करण्यासाठी माण देवी मंदिर समोरआरोपींनी बोलावले आढाव तिथे पोहचताच तुझी पत्नी सरपंच पदाचा राजिनामा का देत नाही म्हणून १५ ते १६ जणांच्या टोळक्याने हातामध्ये सिमेंटचे ब्लॉक, दगडी घेवुन मोटारीवर तुफान दगडफेक सुरू केली.

आढाव यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून तूला जिवे ठार मारतो असे म्हणत हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. शिरगावातील सरपंचाची निर्घृण हत्या, कुख्यात गुंड अनिल मोहितेने भावाच्या हत्येची दिलेली सुपारी यासह आयटीतील अनेक गंभीर घटना ताज्या असताना आढाव यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यामुळे आयटीत खळबळ उडाली असून सर्व सामान्य नागरिकात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT