Pusane first village in country to use solar energy pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

Solar Energy : सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव पुसाणे

पुसाणे गावाची विजेची समस्या पुर्णपणे सुटणार

सकाळ वृत्तसेवा

ऊर्से : मावळ तालुक्यातील पुसाणे गावाला सौरउर्जा वापरणारे देशातील पहिले गाव म्हणून मान मिळाला आहे,या गावामध्ये भव्यदिव्य असा सोलर सिस्टीम प्रकल्प कार्यान्वित होवून त्याचा लोकार्पन सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यामुळे पुसाणे गावाची विजेची समस्या पुर्णपणे सुटणार आहे.या प्रकल्पासाठी २ कोटी ६० लाख रूपये खर्च आला.

तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष  किशोर आवारे,गावचे सरपंच संजय आवंढे यांच्या प्रयत्नातून व एमटीयु इंडिया कंपनीच्या माध्यमातून गावामध्ये सोलर सिस्टीम प्रकल्प उभारण्यात आला. त्याचा लोकार्पन सोहळा कंपनीच्या जर्मनी येथील मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख मिशेल लिऊ,

टोबियास ऑस्टरमेलर,जिओव्हानी स्पाडारो,भारतातील व्यवस्थापकीय संचालक जी एस सेल्विन यांच्या उपस्थितीत पार पडला.ग्रामस्थांच्यावतीने परदेशी पाहुण्यांची यावेळी ढोल ताशाच्या गजरात सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणुक काढण्यात आली.ग्रामस्थांच्या स्वागताने परदेशी पाहुणे भारावले.

याप्रकल्पापासून रोजची चाळीस किलोवॅट विजनिर्मिती होणार असून त्यामुळे गावातील रस्त्यावरील लाईट,शाळा,ग्रामपंचायत कार्यालय,मंदीरे,गावाला पाणीपुरवठा करणा-या उपसा योजनेच्या मोटारींसाठी २४ तास विजपुरवठा होणार आहे.

भविष्यात संपुर्ण गावातील कुटुंबां सुध्दा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.दिड हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने सोलर सिस्टीम यंत्रणा उभी करण्यासाठी २० लाख रुपये खर्च केले तर एमटीयु कंपनीने यासाठी २  कोटी ४० लाख रुपये खर्च केले आहेत.

यामध्ये केवळ सोलर सिस्टीमच नाही तर बॅटरी बॅकअप,आणि जनरेटर बॅकअप देखील या सोलर सिस्टीम प्रकल्पाला देण्यात आला असल्याने पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा विजपुरवठा सुरळीत राहणार असल्याने विजे अभावी पाण्यासाठी होणारी महिलांची वणवण थांबणार असून तसेच विद्यार्थी सुध्दा अभ्यासापासुन वंचित राहणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.प्रकल्पासाठी माजी सरपंच धनाजी वाजे,पोपट वाजे,शशिकांत वाजे,गोरख रावडे व पुसाणे ग्रामस्थांचे योगदान लाभले.

सिंगापुर,इटली व जर्मणी येथुन आलेल्या पाहुण्यांनी सांगितले कि आम्ही पहिल्यांदाच अश्या प्रकारची मदत केली असुन याचा आम्हाला खुप आनंद होत आहे.भविष्यात या प्रोजेक्टचा वापर व्यवस्थित झाल्यास गावातही वीज पुरवठा सर्वांना करता येईल याबाबत विचार करता येईल असे सांगितले. गावचे सरपंच संजय आवंढे म्हणाले गावाने २० लाख रूपये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मदत केली.गावाचा विकास हाच सर्वांचा विकास ठरणार असल्याने हा प्रकल्प गावासाठी महत्वाचा ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 1.43 लाख गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार; काय आहे प्रकरण?

तीन मैत्रिणींच्या गुलाबी प्रवासाची गोष्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; ट्रेलरने घातली प्रेक्षकांना भुरळ

AUS vs PAK 2nd ODI: DRS घेऊ का? मोहम्मद रिझवानचा प्रश्न अन् Adam Zampa ने अख्ख्या पाकिस्तान संघाचा केला 'पोपट', Video

Latest Maharashtra News Updates : मविआने अनेक प्रकल्पांचं काम थांबवलं - मोदी

Viral Video: ..अन् बाबा वाचले! मायक्रो सेकंदात वंदे भारत एक्स्प्रेस येऊन चिकटली; हृदयाचा ठोका चुकणारा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT