QR code scan Crime through online fraud and social media is on the rise 
पिंपरी-चिंचवड

क्‍यू आर कोड स्कॅन करताय? सावधान! 

सुवर्णा नवले

माहिती-तंत्रज्ञान युगात डिजिटल व्यवहार होत असले तरी धोक्‍याची घंटाही तितकीच मोठी आहे. थेट खात्यातून रक्कम गेल्यास त्याची तीव्रता समजते. नियमित गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. तुटपुंज्या मनुष्यबळावर सायबर विभागाचा कारभार सुरू आहे. ऑनलाइन फसवणूक व सोशल मीडियाच्या माध्यमातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा आढावा घेणारी मालिका आजपासून.... 

पिंपरी -  दिवाळी फराळ बनविणाऱ्या बचत गटाच्या महिलेला कॉल आला. त्यावर व्यक्‍तीने सांगितले की, ""मी सैन्यदलात अधिकारी आहे. सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठवायचा आहे. त्यासाठी विविध फराळ काही किलो हवा आहे. मागणी नोंदवा आणि बिलाची रक्कम देण्यासाठी क्‍यूआरकोड स्कॅन करा. हा सैन्यदलाचा नियम आहे.'' यामुळे महिलेने त्यावर विश्‍वास ठेवून क्‍यूआर कोड स्कॅन केला. त्याचक्षणी तिच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी तब्बल पन्नास हजार रुपये वजा झाले. चिंचवडमधील ही घटना. अशा प्रकारे शहरात मागील आठ महिन्यांत नऊ गुन्हे घडले आहेत. "क्‍यूआरकोड' स्कॅन करणं म्हणजे चेकवर सही करण्यासारखं आहे. परिणामी, अशा सायबर गुन्ह्यांपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी प्रत्यक्ष व्यवहारांवर भर देणं अपेक्षित आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांपेक्षाही दररोज नागरीक या ना त्या कारणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. दररोजच्या गुन्ह्यांच्या तुलनेत सायबर गुन्हे वेगाने वाढू लागले आहेत. याचा प्रत्यय नागरीकांना पावलोपावली येऊ लागला आहे. एखाद्या माहितीपर्यंत पोहचण्यासाठी व एखाद्या व्यवहाराचे थेट पेमेंट करण्यासाठी "क्‍यूआरकोड'ची मदत घ्यावी लागत आहे. फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून सर्रास "क्‍यूआरकोड' स्कॅन केले जातात. मात्र, असे व्यवहार करताना समोर व्यवहार झाला आहे हे त्वरीत समजते. मात्र, आभासी व्यक्ती, लिंक व क्‍यूआरकोडच्या माध्यमातून व्यवहार करणे चुकीचे आहे. थेट खात्यातून पैसे वजा झाल्यास समजते. तोपर्यंत उशीर होऊन ब्लॅकमेलिंग झाले आहे हे समजते. 

असेही घडताहेत गुन्हे 
"चटकदार थाळी एकावर एक फ्री आहे', "क्‍लिक करा निवडा तुमचा आवडीचा व्यवसाय', 'नोकरी मिळवा एका क्‍लिकवर', त्वरीत इन्शुरन्स भरा, इनकम टॅक्‍स रिटर्न भरायचा आहे. अशा विविध योजनांचे अमिष दाखवून लिंकच्या आधारे "क्‍यूआरकोड' स्कॅन केले जात आहेत. हे सर्व यूपीआय आयडी मिळविण्यासाठी केले जाते. असे फ्रॉड घडत आहेत. 

अशी घ्या काळजी 
- युपीआय आयडी हा कोणालाही सांगण्यासाठी नसतो 
- अनोळखी मेलला रिप्लाय करु नये 
- गुन्हेगाराकडून व्हॉईस फिशिंग(आवाज बदलून) होते हे लक्षात घ्या 
- फिशिंग मालवेअर (बनावट) क्‍यूआर कोड स्कॅन करु नका 
- घाईत कोणताही आर्थिक व्यवहार करु नका 
- लिंक खात्याचा मोबाईल नंबर कोणालाही सांगू नका 
- आरोपीकडून कोणत्याही कामासाठी कमी रक्कम खात्यावर मागवू नका 

""व्यक्ती खरी की खोटी हे आपण एका कॉल वरून कसे काय पडताळतो. नागरीकांनी सद्‌सदविवेक बुद्धी जागरूक ठेवणे गरजेचे आहे. स्कॅनिंग व कोणत्याही अनोळखी लिंकच्या माध्यमातून गैरव्यवहार वाढले आहेत. कार्ड स्कीमरचेही प्रकार वाढले आहेत. आपला डेटा सुरक्षित ठेवणे गरजेचं आहे. भारतातूनही अशा ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, दिल्ली या राज्यातून सायबर टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यासाठी नागरीकांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे. नजरेआड घडणाऱ्या घटनांपर्यंत पोहचणं अवघड आहे. कोणताही पुरावा हाती लागत नाही.'' 
- संजय तुंगार, सायबर पोलिस निरीक्षक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT