पिंपरी-चिंचवड

सांगवीतील 'या' सामाजिक संस्थेनं एवढ्या पशु, पक्ष्यांना जीवदान दिलंय, त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वाचा...

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे)  : पिंपरी चिंचवड शहरातून पवना नदी वाहत असल्याने या नदीकाठी अनेक प्राण्यांची नैसर्गिक वस्तीस्थाने आहेत. बहुतांश नदीकाठावर गर्द झाडी, तर पिंपळे सौदागर सारख्या काही ठिकाणी छोटी-छोटी बेट उभी राहिली आहेत. त्यामुळे या नदीकाठावर वा तेथील गर्द झाडीत अनेक पक्षी व प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास आढळून येतो. त्यामुळे कित्येकदा हे प्राणी नकळत मानवी वस्तीत घुसल्याचे चित्र पहायला मिळते आणि परिणामतः अशा प्राण्यांवर मानव वा इतर भटकी कुत्र्यांकडून हल्ला केल्याने ते जखमी किंवा मृत्यू पावत असतात. परंतु, मागील काही वर्षांपासून सांगवी येथील वन्य पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सेवाभावी कार्यामुळे अशा असंख्य प्राण्यांना अभय मिळाले आहे. त्यामुळे सांगवीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे जाळे चांगलेच पसरले आहे. गेल्या चोविस तासात संस्थेने घोरपड, मोर, चातक पक्षी व उदमांजर जीवदान देऊन भूतदया दाखविली आहे. 

घटना क्रमांक 1 - जुनी सांगवीतील क्रीडा शिक्षक राजु थापा यांना ममतानगर भागात एका अडगळीच्या बिळात सापाचे तोंड दिसले. अधुनमधून तो जीभ बाहेर काढत असल्याचे थापा यांना स्पष्ट दिसत होते. त्यांनी लागलीच संस्थेला फोन लावला असता सचिव विनायक बडदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. बडदे यांनी निरखून पाहिले, तर तो साप नसून, घोरपड असल्याचे सांगितले. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ती घोरपड पकडली व संस्थेच्या रजिस्टरला नोंदवून तीची पुन्हा नदीकाठावर सुटका केली. सांधे किंवा मणक्यांचे आजार घोरपडीचे मांस खाल्याने बरे होतात, या चुकीच्या माहितीमुळे अनेकदा घोरपड मारली जात असल्याने प्राणी साखळीतून तिची संख्या कमी होत चालल्याने प्राणी मित्र चिंतेत असल्याचे बडदे यांनी सांगितले. 

घटना क्रमांक 2 - वाल्हेकरवाडी येथील एका शेतात मोराच्या मागे कुत्री लागली. कसाबसा आपला जीव वाचवीत तो मोर एका घरात शिरला. पण कुत्र्यांनी पळताना त्याची पिसे पुरती ओरबाडून काढली होती व पायाला जखम केली. तेथील स्थानिकांनी संभाजीनगर आकुर्डी येथील बहिनाबाई प्राणी संग्रालयात संपर्क साधला असता लॉकडाउनमुळे त्यांच्याजवळ मनुष्यबळ कमी होते. तेथूनच त्यांना सांगवीतील वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचा फोन नंबर दिला असता तत्काळ या कार्यकर्त्यांनी मोराला ताब्यात घेऊन त्याच्यावर औषधोपचार करून त्याची सुटका केली. 

घटना क्रमांक 3 - पावसाचा थेंब आपल्या चोचीत झेलणारा दुर्मीळ होत चाललेला चातक पक्ष्याच्या मागे काही कावळे लागले होते. त्यांच्या हल्यात पुरता तो जखमी झाला होता. तेंव्हा रस्त्यावर थांबलेल्या तरुणांनी त्या पक्षाला संस्थेच्या निवारा केंद्रात दाखल केले. त्याच्यावरही औषधोपचार करून त्याला नदीकाठावर सुरक्षित सोडून देण्यात आले. 

घटना क्रमांक 4 - भोसरी आळंदी रोडला गवळीनगर येथे एका नव्याने बांधकाम चालु अललेल्या इमारतीत उदमांजर असल्याचे प्राणी मित्र राजू कदम यांनी संस्थेला फोन केला. त्यावेळी संस्थेचे सचिव बडदे त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे पोचले. लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने त्या उदमांजराने चार पिलांना इमारतीच्या सातव्या मजल्यावर जन्म दिला होता. पुन्हा काम सुरू झाल्याने मजुरांची वर्दळ पाहून ते भेदरले होते. पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या चार पिल्लांसह ते उदमांजर सुरक्षितपणे पकडण्यात आले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनायक बडदे म्हणाले, "उदमांजर हे सडलेले मांस खाते. त्यामुळे लहान मुलांचे ज्या ठिकाणी दफन होते. अशा ठिकाणी त्याचा वावर असतो. यामुळेच त्याला म्हसण्या असेही म्हणतात. दोन महिने पुर्ण लॉकडाउनमुळे निर्धास्त झालेले प्राण्यांना मनुष्याचा उपद्रव जाणवत नव्हता. परंतु, अनलॉकमुळे पुन्हा यांच्या अधिवासावर अतिक्रमण सुरू झाले आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT