Saath Chal sakal
पिंपरी-चिंचवड

Saath Chal : जलसंवर्धनाचा उद्या पिंपरीत जागर; देहू संस्थान, आळंदी देवस्थानचे सहकार्य

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शुक्रवारी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शनिवारी आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. त्यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे ‘साथ चल’अंतर्गत वैष्णवांच्या साक्षीने ‘वारी विठुरायाची अन् जलसंवर्धनाची’ उपक्रमांतर्गत रविवारी (ता. ३०) पिंपरीत आणि मंगळवारी (ता. २) पुण्यात जलसंवर्धनाचा जागर केला जाणार आहे. या उपक्रमाला देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे सहकार्य लाभले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. २९) आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. रविवारी (ता. ३०) सकाळी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होईल. पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी चौक) ‘सकाळ’ आणि फिनोलेक्स केबल्स यांच्यातर्फे पालखी सोहळ्याचे स्वागत होईल.

त्यापूर्वी भाविकांना ‘जल संवर्धनाची’ शपथ दिली जाईल. त्यानंतर सोहळ्यात सहभागी होऊन भाविकांनी पाण्याचे महत्त्व जाणून ‘जल संवर्धनासाठी’ एचए कंपनी कर्मचारी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळील भुयारी मार्गापर्यंत चालायचे आहे. तिथेही ‘जल संवर्धनाची’ शपथ दिली जाईल.

या ‘साथ चल’ दिंडीत परिसरातील भजनी मंडळे, गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, गृहनिर्माण सोसायट्या, व्यवस्थापन, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंपन्यांचे अधिकारी, कामगार, सेलिब्रिटी, व्यापारी, वकील, उद्योजक, साहित्यिक, कामगार संघटनांचे सदस्य, पदाधिकारी आदींना सहभागी होता येणार आहे.

पुण्यात मंगळवारी ‘साथ चल’

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे रविवारी (ता. ३०) पुण्यात मुक्काम पोहोचतील. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर मंगळवारी (ता. २) सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. त्यावेळी सकाळी सात वाजता पुणे कॅम्पातील महात्मा गांधी बसस्थानक (पूल गेट) परिसरात ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तिथे भाविकांना ‘जल संवर्धनाची’ शपथ दिली जाईल. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी म्हणजे तीर्थ आणि श्रद्धा...

तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनीं, मिळालिया संतसंग, समर्पितां भलें अंग, या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव असतो. तीर्थ म्हणजे पाणी असते. पण, संतांचा सहवास लाभतो. तिथेच समर्पण केले जाते, अर्थात अंग म्हणजे देह अर्पण केला जातो. फक्त तुमच्या मनात भाव हवा. त्याचे फळ हमखास मिळते. हा संतांचा संग नास्तिकांनाही आपल्या संगतीत बदलून टाकतो.

पाप अर्थात दुष्कर्म नाहीसे झाल्याची भावना मनामध्ये येते. असेच दुष्कर्म अनेकांकडून सध्या होत आहे. देहू, आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रांचे सानिध्य लाभलेल्या इंद्रायणी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. हीच नदी पुढे भीमा आणि नंतर चंद्रभागा होते. याच नद्यांचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतो. घरांमध्ये आणि शेतात हेच पाणी जाते. त्यामुळे त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘साथ चल’च्या उपक्रमात जल संवर्धनाची शपथ घेऊन जनजागृतीसाठी काही पावले चालू या!

साथ चल शपथ

आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतांच्या साक्षीने शपथ घेतो की, माझ्यासह माझ्या कुटुंबाचे, शहराचे आणि देशाचे ‘जीवन’ असलेल्या पाण्याच्या संवर्धनाचा मी संकल्प करीत आहे. नदी, नाले, ओढे यांसह विहिरी, तलाव, धरणे यांतील पाणी स्वच्छ ठेवणे, त्यांची निगा राखणे हे माझे नित्यकर्तव्य आहे.

त्याला अनुसरून सदैव माझी कृती राहीन. सकल प्राणिमात्रांसाठी, जीवसृष्टीसाठी पाणी हे जीवन आहे आणि मी त्याचे संवर्धन करेन, अशी मी ग्वाही देतो. वारीच्या निमित्ताने निसर्गाची, समाजाची, देशाची आणि जलदेवतेची सेवा माझ्या हातून घडो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना!

निसर्गाने हवा आणि पाणी हे विनामूल्य भरभरून दिले आहे. मात्र, हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून, भविष्यात आपणाला विकतसुद्धा जल मिळणे अवघड होईल. त्यामुळे प्रत्येकाने जलसंवर्धन करणे आवश्यक आहे. ‘सकाळ’ने राबविलेले अनेक उपक्रम कौतुकास्पद आहेत.

- पुरुषोत्तम महाराज मोरे, अध्यक्ष, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू

नद्यांचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. राज्य शासन आणि जनतेने एकत्र येत जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. उद्याचा काळ उज्ज्वल असेल. आषाढी वारीतील ‘सकाळ’चा उपक्रम समाजासाठी दिशा देणारा ठरेल.

- माणिक महाराज मोरे, सोहळाप्रमुख

पाणी हे जीवन आहे. पाणी असेल तरच जीवसृष्टी टिकेल. जलसंवर्धन होणे काळाची गरज आहे. त्यासाठी संस्थान नेहमी सहकार्य करेल.

- विशाल महाराज मोरे, सोहळाप्रमुख

इंद्रायणी नदी आणि परिसरातील नद्यांचे प्रदूषण रोखले पाहिजे. त्यात राज्य शासन आणि नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. वारीतील वारकऱ्यांना जलसंवर्धनाचा संदेश दिला जाईल.

- संतोष महाराज मोरे, सोहळाप्रमुख

‘सकाळ’तर्फे राबविण्यात येणारे उपक्रम हे जनतेसाठी उपयुक्त असतात. संत तुकाराम महाराज संस्थानचा नेहमी या उपक्रमांना पाठिंबा आहे. जलसंवर्धन काळाची गरज असून, युवकांनी पुढे येऊन यात सहभागी व्हावे.

- संजय महाराज मोरे, विश्‍वस्त

‘सकाळ’ दरवर्षी विविध उपक्रम राबविते. आई-वडिलांची सेवा, पर्यावरण संरक्षण आणि जागृती करण्यासाठी ‘साथ चल’च्या माध्यमातून जनतेमध्ये संदेश दिला आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचा यात पूर्णपणे सहभाग आहे.

- भानुदास महाराज मोरे, विश्‍वस्त

वाढत्या दुष्काळी परिस्थितीत जलसंवर्धन आवश्यक आहे. जलसंवर्धनाबाबत जेवढी पिढी जागृत होईल; तेवढा भविष्यकाळ सुखकर असणार आहे. त्यामुळे सर्वांनी यात सहभागी व्हावे.

- अजित महाराज मोरे, विश्‍वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT