पिंपरी - ‘नव्याने विकसित होणाऱ्या ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे या भागातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी आठ दहा दिवसांमध्ये वर्क ऑर्डर देणार आहोत. जे उर्वरित रस्ते आहेत त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून पुढील वर्षी काम हाती घेतले जाणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता २०४१ ची गरज ओळखून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ताथवडे येथे शनिवारी (ता. ५) केले.
‘सकाळ माध्यम समूहाच्या’ वतीने ताथवडेतील ‘सिल्वर बॅक्वेट हॉल’ येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे उद्घाटन प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी श्री सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक जितेंद्र सोनिगरा, पुनामिया प्रॉपर्टीजचे संचालक यश जैन, ऐश्वर्यम् ग्रुपच्या असोसिट डायरेक्टर नम्रता बन्सल, ऑक्टोपस आर्मस् होम्स सोल्यूशनचे संचालक श्रीकांत सोमवंशी, एव्हरनेस्ट ग्रुपचे संचालक दत्तात्रेय येवले, सुमीत शर्मा, नरसिंग गाढवे, माहेश्वरी रिअॅलिटीजचे संचालक प्रशांत ब्राम्हणकर, उदय कन्स्ट्रक्शनचे बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक चेतन भुजबळ, सिव्हर बँक्वेट हॉलचे संचालक अनिकेत पवार, वर्धमान स्पेसेसचे संचालक प्रकाश छाजेड, परमानंद जमतानी आदी उपस्थित होते.
नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरत आहे. शहरातील दर्जेदार गृहप्रकल्पांचे स्टॉल, गृहकर्जाविषयी माहिती हे सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘विकसकांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील’
‘शहरातील पाणीपुरवठा, वीज, स्थापत्य हे विभाग माझ्याकडे आहेत. शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करीत आहोत. त्या अनुषंगाने जे भामा आसखेडसारखे काही उर्वरित प्रकल्प आहेत, ते डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल. पुढील पंचवीस वर्षांपर्यतचे पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिका करीत आहे. विकसकांना रस्ता पाणी यासारख्या भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यरत आहे.
या भागातील सर्व विकसकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘सकाळ’ने राबविलेला ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. एकाच छतासाठी या भागातील सर्व प्रोजेक्ट पाहता येणार आहेत. त्याचा फायदा नागरिकांना निश्चित होईल.’’
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
या प्रदर्शनात एकाच ठिकाणी सर्व प्रोजेक्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कोणता प्रोजेक्ट प्रत्यक्ष पाहायला जायचे हे ठरविणे सोपे जात आहे. आम्ही ताथवडे परिसरात घर पाहत आहोत. येथील सर्वच प्रोजेक्ट मोठे आहेत. त्यामुळे एक्स्पोत आल्याचा निश्चित फायदा झाला.’’
- प्रियांका जाधव, आदर्शनगर, रावेत
ताथवडे, पुनावळे, वाकड, रावेत, किवळे, मावळ, मुळशी व परिसरातील सर्व नामांकित बांधकाम कंपन्यांचा एक्स्पोमध्ये सहभाग असल्याने पैसा आणि वेळ वाया न घालवता सर्वच पर्याय आम्हाला एकाच ठिकाणी जाणून घेता आले. त्यामुळे, प्रोजेक्टचे एकमेकांसोबत तुलना करता आली. आता निर्णय घेणे सोपे झाले आहे. आम्हाला साईट व्हिजिट करण्याची देखील सुविधा मिळाल्याने प्रत्यक्षात फ्लॅट व प्रोजेक्ट जाऊन बघता आला.
- सुप्रिया यादव, शिक्षिका, वाकड
‘सकाळ’ वर्षातून दोन ते तीन वेळा प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करत असल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबीयांना स्वप्नातील घर घेण्याची एक सुवर्णसंधी प्राप्त होते. ‘सकाळ’मुळे घरांचे सर्व पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे, आमची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी ‘सकाळ’ची मोठी मदत होत आहे, असे माझे प्रामाणिक मत असल्याने ‘सकाळ’चे आभार.
- रोहित सिसोदिया, चिंचवड
मी राहायला पुण्यात आहे. मात्र, मला पिंपरी-चिंचवडमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे. ‘सकाळ’चा एक्स्पो भरविण्यात आल्याने त्यामुळे मी आवर्जून आलो आहे. माझ्या आवडीप्रमाणे ठिकाण आणि बजेटच्या काही प्रॉपर्टीज पाहता आल्या. ‘सकाळ’मुळे अनेक नामांकित बिल्डर्सचे प्रोजेक्टची माहिती मिळाली.
- प्रशांत तळेले, सिंहगड, पुणे
‘सकाळ’ आयोजित केलेल्या प्रॉपर्टी एक्स्पोने एकाच छताखाली योग्य किमतीतील अनेक लहान-मोठे प्रोजेक्ट्सबद्दल कळाले. सर्व माहिती मिळाली. आम्हाला अनेक ऑफर देखील मिळाल्या. त्यामुळे, बजेटनुसार आवडीचे घर घेण्यासाठी प्रत्येक साईटवर जाण्याची किंवा सर्वत्र फिरण्यात फार मेहनत घेण्याची गरज लागली नाही.
- अनिता भोसले, वाकड
आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून घराचा शोध घेत आहे. ‘सकाळ’ नेहमीच आमच्या सारख्या गरजू वाचकांची इच्छापूर्ती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते. एक्स्पोतील सहभागी प्रोजेक्टमधील कार्पेट एरिया अधिक आहे. एमेनिटीज देखील इतर प्रोजेक्टपेक्षा निश्चित जास्त आहेत. त्यामुळे, एक रिच फील आला.
- महेश माने, मोशी
उत्तम नियोजन करून ‘सकाळ’ने घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सुसज्ज हॉल, प्रशस्त पार्किंग व्यवस्था असल्याने कोणताही त्रास झाला नाही. एक्स्पोमध्ये सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने बजेटला अनुरूप व आपल्या आवडीला प्राधान्य देत निर्णय घेणे सोपे झाले आहे.
- रणजित गडदे, रावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.