Sakal Vastu Property Expo 2023 Sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vastu Property Expo : घर घेण्यासाठी अनुकूल वातावरण; ‘पीएमआरडीए’चे आयुक्त महिवाल यांचे प्रतिपादन

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिखली येथील सीझन बॅंक्वेट हॉलमध्ये आयोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या उद्‍घाटनप्रसंगी महिवाल बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘पर्यावरणाला धक्का न लावता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पीएमआरडीए क्षेत्राचा शाश्वत विकास करायचा आहे, त्यासाठी नियोजनबद्ध पायाभूत व मूलभूत सुविधा दोन्ही महापालिका व पीएमआरडीए पुरवीत आहे. मोशी, चिखली, चऱ्होली या भागांसह अन्य परिसरातही घर घेण्यासाठी सध्या पोषक व अनुकूल वातावरण आहे,’ असे मत पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त राहुल महिवाल यांनी शनिवारी (ता. २८) व्यक्त केले.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिखली येथील सीझन बॅंक्वेट हॉलमध्ये आयोजित ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या उद्‍घाटनप्रसंगी महिवाल बोलत होते. महापालिका शहर अभियंता मकरंद निकम, सहायक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आणि मुख्य सरव्यवस्थापक रूपेश मुतालिक यांनी त्यांचे स्वागत केले. ‘सकाळ’तर्फे बांधकाम व्यावसायिक व त्यांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये मातोश्री ग्रुपचे विवेक तापकीर, चेतन साळुंके, प्रशांत थोरात, प्रीतम जगताप, स्वप्नील साळुंके, प्रीतेश थोरात, मंत्री ग्रुपचे दिनेश जहागीरदार, नागेश्वर ग्रुपचे योगेश आल्हाट, योगेश एंटरप्रायझेसचे संजय भोंगाळे, टुलिप प्रॉपर्टीजच्या मनीषा गायकवाड, ऐश्वर्यम ग्रुपच्या नम्रता बन्सल, अर्बन होमचे श्यामसुंदर भसाड, अमरनाथ ग्रुपचे जयेश माने, रॉयल ग्रुपचे अतुल शिंदे आणि सीझन बॅंक्वेट हॉलचे अमित फडांगरे यांचा समावेश होता.

स्वतःचे, मनासारखे आणि ‘बजेट’मधील घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि भाडेतत्त्वावरील घरातून स्वतःच्या हक्काच्या घरात जाऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे आयोजन केले आहे.

‘सकाळ वास्तू एक्स्पो’चा आज समारोप

चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मी चौकालगतच्या सीझन बॅंक्वेट सभागृहात ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ आयोजित केला आहे. त्याचा समारोप रविवारी (ता. २९) रात्री आठ वाजता होणार आहे. ‘वास्तू एक्स्पो’मध्ये वीसपेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले असून, शंभरपेक्षा अधिक प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे.

अधिकारी म्हणाले...

नवनगर विकास प्राधिकरण १९७२ मध्ये अस्तित्वात आले. २०२१ मध्ये त्याचे ‘पीएमआरडीए’मध्ये विलीनीकरण झाले आहे. त्यानुसार विकसित भाग महापालिकेकडे वर्ग केला आहे. अविकसित भाग ‘पीएमआरडीए’कडे आहे. मात्र, या संपूर्ण भागाच्या विकासाचे उत्तरदायित्व आम्हा दोन्ही संस्थांवर आहे. महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत व मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत, त्यामुळे बांधकामे होत आहेत. नियोजनबद्ध विकास केला जात आहे. ग्रीनहाउससारखे प्रकल्प राबवायचे आहेत. या शहराचा जलदगतीने विकास होत असून, घर घेण्यासाठी अनुकूल काळ आहे.

- राहुल महिवाल, आयुक्त, पीएमआरडीए

चऱ्होली, मोशी, चिखली हा भाग मोठ्या वेगाने विकसित होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण, रुंदीकरण सुरू आहे. नवीन डीपी रस्त्यांचे नियोजन आहे. या भागात वास्तू एक्स्पो होत असल्यामुळे अनेक नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. एकाच ठिकाणी अनेक प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. दहा वर्षांपूर्वी चिखली, मोशी भाग ओसाड होता. इथे शेतीशिवाय दुसरे काहीही नव्हते. मात्र, गेल्या दहा वर्षांत सर्वच बदलले आहे. निवास क्षेत्र वाढले आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प असून, परवडणारी घरे उपलब्ध आहेत. मूलभूत सुविधा देण्यावर आमचा भर आहे.

- मकरंद निकम, शहर अभियंता, पिं.चिं. महापालिका

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी हे गाव ते महानगर असा प्रवास केलेले शहर आहे. १९७२ मध्ये पाच गावांची मिळून नगरपालिका झाली. त्यात आणखी गावे समाविष्ट करून १९८२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली. या चाळीस वर्षांत शहरात वेगवान प्रवास झाला आहे. महापालिकेत समाविष्ट सर्व गावे व परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामध्ये येथील भूमिपुत्रांसह कामगार, उद्योजक, लोकप्रतिनिधींसह बांधकाम व्यावसायिकांचे योगदानही मोठे आहे. त्यांच्यामुळे घरांची उपलब्धता होत असून, विविध आरक्षणांचा विकास होत आहे. सर्वांच्या योगदानात स्मार्ट शहर होत आहे.

- अण्णा बोदडे, सहायक आयुक्त, पिं.चिं. महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT