Sakal Vidya Expo 2023 sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vidya Edu Expo : प्रदर्शनातून करिअरची योग्य दिशा - आयुक्त शेखर सिंह

पिंपरी शहरातील नामांकित महाविद्यालयांना यशस्वीरीत्या एकत्रित आणण्याचे काम ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील नामांकित महाविद्यालयांना यशस्वीरीत्या एकत्रित आणण्याचे काम ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे. ‘सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनासारखा स्तुत्य उपक्रम राबवून, विद्यार्थ्यांना करिअरची योग्य दिशा दिली आहे. महापालिकेनेदेखील ‘सकाळ’सारखाच ‘जल्लोष शिक्षणाचा’ हा उपक्रम राबवला आहे. त्याचा उपयोग अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे.’’ असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शनिवारी (ता. १७) केले.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन दिवसीय ‘सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो २०२३’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यात ‘के. जी.’ ते उच्च शिक्षण आणि विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञांची व्याख्यानेही आयोजित केली आहेत. मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये संतोष रासकर, डॉ. शीतलकुमार रवंदळे, प्रा. सागर भडंगे, प्रा. डॉ. केतन देसले, विवेक वेलणकर यांची विविध विषयांवरील व्याख्याने झाली. रविवारी याच ठिकाणी डॉ. मानसी अतितकर, डॉ. अनिकेत नागणे, डॉ. स्वाती बनकर, डॉ. प्रसाद कुलकर्णी, देवदत्त कशाळीकर, डॉ. दीपक शिकारपूर, आशिष दुबे, नौशाद शेख यांची विविध विषयांवरील व्याख्याने होणार आहेत.

डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो’ हे प्रदर्शन निश्‍चितपणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. या प्रदर्शनाला पालकांनी भेट देणे आवश्‍यक आहे.’’

डॉ. संदीप पाचपांडे म्हणाले, ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो’ प्रदर्शनात एएसएम ग्रुपने सहभाग घेतलेला आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात नवीन शैक्षणिक धोरणांची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होईल.’

‘ग्लोबल युथ नेटवर्किंग’ संकल्पना राबविणार : आयुक्त सिंह

पिंपरी चिंचवड महापालिका ‘ग्लोबल युथ नेटवर्किंग’ ही संकल्पना राबविणार आहे. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून शहरातील झोपडपट्टी भागातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांमधील किमान कौशल्‍य शोधून त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. शहरासह अन्य भागातील कंपन्यांना आवश्‍यक असणारी कौशल्‍ये या मुलांना शिकविणार आहोत. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होईल. तसेच महापालिकेकडून ‘लाईट हाऊस’ हा प्रकल्प सुरू आहे. या माध्यमातून युवक-युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण, नोकरी मिळविणे याबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

स्टॉलवर विद्यार्थी व पालकांची गर्दी

या प्रदर्शनात मांडलेल्या स्टाॅलवर विद्यार्थी, पालक भेट देऊन माहिती घेत होते. यात इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षा असो की ‘शॉर्टटर्म कोर्स’ अशा विविध शैक्षणिक क्षेत्रातील माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती. विविध महाविद्यालये, क्लासेस, ऍनिमेशन संस्था, शैक्षणिक कर्ज पुरवठा करणाऱ्या बॅंका आदी ३५ नामवंत संस्था या प्रदर्शनात सहभागी झाल्‍या आहेत.

शैक्षणिक संस्थांच्या १०० हून अधिक अभ्यासक्रमांची माहिती प्रदर्शनात उपलब्ध आहे. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पालकांबरोबरच विद्यार्थीही प्रदर्शनाला भेट देऊन शिक्षण ते नोकरीच्या क्षेत्रातील नव्या संधी जाणून घेताना दिसले. उद्या (रविवारी) या प्रदर्शनाचा समारोप होत आहे. सेमिनारमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून भेट देण्यात येत आहे.

...या संस्थांचा सहभाग

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सहयोगी प्रायोजक लर्निंग लेन्स ॲकॅडमी, एमआयटी आटर्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज हे आहेत तर औद्योगिक शिक्षण मंडळ, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी, आय. आय. बी., मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल फॉरेसिंक सायन्स युनिर्व्हसिटी, अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कमला एज्युकेशन सोसायटी, आय.आय. बी. एम., आचार्य ॲकॅडमी, ए.आय.सी. टी., कारवर ट्रेनिंग, फ्रेमबॉक्स, टाइम्स ॲण्ड ट्रेंडस ॲकॅडमी, शास्‍त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप-आंबी, मराठवाडा मित्र मंडळ, आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पेस आय. टी. ॲण्ड मेडिकल या शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. कॉसमॉस बॅंक बॅंकिग पार्टनर आहे.

या संस्थांचा सहभाग

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सहयोगी प्रायोजक लर्निंग लेन्स ॲकॅडमी, एमआयटी आटर्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज हे आहेत तर औद्योगिक शिक्षण मंडळ, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी, आय. आय. बी., मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल फॉरेसिंक सायन्स युनिर्व्हसिटी, अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कमला एज्युकेशन सोसायटी, आय.आय. बी. एम., आचार्य ॲकॅडमी, ए.आय.सी. टी., कारवर ट्रेनिंग, फ्रेमबॉक्स, टाइम्स ॲण्ड ट्रेंडस ॲकॅडमी, शास्‍त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप-आंबी, मराठवाडा मित्र मंडळ, आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पेस आय. टी. ॲण्ड मेडिकल या शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. कॉसमॉस बॅंक बॅंकिग पार्टनर आहे.

शहरात ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो’ हे प्रदर्शन २००९ पासून सुरू आहे. या १४ वर्षात ‘सकाळ’च्या शैक्षणिक प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे फायदा झालेला आहे. अशाप्रकारचे उपक्रम राबवत असल्याने ‘सकाळ’ माध्यम समुहा’चे विशेष अभिनंदन. भविष्यात महापालिकादेखील ‘सकाळ’प्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात नवीन प्रयोग करणार आहे.

- शेखर सिंह, आयुक्त पिंपरी चिंचवड, महानगरपालिका

‘सकाळ’चे शैक्षणिक प्रदर्शन म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा ‘गेट वे’च आहे. विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचा मार्ग शोधण्यासाठी प्रदर्शन उत्तम असे मार्गदर्शक ठरत आहे. ‘सकाळ माध्यम समुहा’च्या या उपक्रमात आमच्या संस्थेचा कायम सहभाग असतो.

- डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट.

कॉसमॉस बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज माफक व्याजदरात उपलब्ध आहे. कमीत कमी कागदपत्रे व जलद प्रक्रियेद्वारे उपलब्ध असून, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कर्ज व्यवस्था भारत व भारताबाहेर शैक्षणिक घेणाऱ्यांसाठी कर्ज देण्यात येते. ‘सकाळ’च्या या प्रदर्शनात पहिल्यांदा सहभागी झाल्याचा आनंद होत आहे.

- प्रीती जाधव, असिस्टंट जनरल मॅनेजर, कॉसमॉस बँक, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT