Sakal Vidya Edu Expo 2023 sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vidya Edu Expo : दहावी-बारावीनंतर आता पुढे काय? उच्च शिक्षणाचे पर्याय एकाच छताखाली

दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात चिंता आहे. दहावी, बारावीचा निकालही लागला आहे. आता पुढे काय?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात चिंता आहे. दहावी, बारावीचा निकालही लागला आहे. आता पुढे काय? कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? असे करिअरविषयक अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहेत.

त्यांचे उत्तर ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ मधून मिळणार आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) करिअरबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. मुख्य प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, तर सहयोगी प्रायोजक क्रिएटिव्ह अकॅडमी, एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून नवीन टेक्नोलॉजीवर भर दिला जात आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण मिळणार आहे.

हॉटेल मॅनेजमेंट, लॉ, डिझाईन, फार्मसी यासारख्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले आहे. ‘ॲक्शन ओरिएटेंड’ शिक्षण विद्यापीठातून दिले जात आहे. सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ मधून याची सविस्तर माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना मिळू शकणार आहे.

- डॉ. सायली गणकर, कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे, आंबी

आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर ‘सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये नामांकित शिक्षण संस्था सहभागी होत आहेत. साई बालाजी एज्युकेशन सोसायटी ही सर्वोत्तम जागतिक शिक्षण देण्याच्या दिशेने काम करणारी एक दूरदर्शी संस्था आहे. विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे.

- मनीष मुंदडा, फाउंडर प्रेसिडेंट, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी

दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या व देशाचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्याची अचूक वाटचाल करण्यासाठी उत्तम पर्यायाची निवड करण्यासाठी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’च्या सेमिनारच्या माध्यमातून तज्ज्ञांचे अचूक व अनमोल मार्गदर्शन करण्यात येते. पुढील शिक्षणासाठी, व्यवसायासाठी सुयोग्य पर्यायाची निवड व करिअर मार्गदर्शनासाठी सल्ला या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमाद्वारे चालू असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.

- प्रा. भाऊसाहेब जाधव, कार्याध्यक्ष, मराठवाडा मित्र मंडळ

अनेकदा विद्यार्थी-पालकांना महाविद्यालय, करिअर निवडताना कसरत करावी लागते किंवा अनेकदा गोंधळ उडतो. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. आळंदी एमआयटी कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना डिझाईन आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले जाते. सीईटी प्रवेश प्रक्रिया, प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन केले जाते.

- पीयूष प्रसाद, हेड, ॲडमिशन ॲण्ड मार्केटिंग, एमआयटी कॉलेज आळंदी

काय? कधी? केव्हा? कुठे?

  • काय? - सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो

  • कधी? - १७ व १८ जून २०२३

  • केव्हा? - सकाळी १० ते रात्री ८

  • कुठे? - ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

काय सांगता?

  • आता घेता येईल करिअरचा योग्य निर्णय

  • दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा

  • शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच छताखाली

  • विविध क्षेत्रातील करियरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

  • अधिक माहितीसाठी - संपर्क - ८३७८९८७८३६

अभियांत्रिकी करिअरबाबत व्याख्यानांचे वेळापत्रक

शनिवार, ता. १७ जून

दुपारी ४ : डॉ. शीतल कुमार रवंदळे - अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर आणि प्लेसमेंटची पूर्वतयारी. प्रा. सागर भडंगे - व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरच्या संधी. प्रा. डॉ. केतन देसले - ट्रेंडिंग करीअरच्या संधी/डीजिटल मार्केटिंग.

सायंकाळी ६ : विवेक वेलणकर (करिअर मार्गदर्शक) - दहावी आणि बारावीनंतर करियरच्या संधी

रविवार, ता. १८ जून

सकाळी ११ : मानसी अतितकर (एमआयटी कॉलेज ऑफ आर्ट, कॉमर्स अँड सायन्स) - बारावीनंतर करिअरला चालना देणारे नवीन युगातील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन.

दुपारी ४ : जस्मिन कुबावत (फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी) - फॉरेन्सिक सायन्समधील वर्तमान ट्रेंड - शिक्षण आणि करिअर दृष्टिकोन

सायंकाळी ५ : आशिष दुबे (एक्सीड अकॅडमी)  - किशोरवयीन मुलांचे पालकत्व

सायंकाळी ६ : नौशाद शेख (क्रिएटिव्ह अकॅडमी) - दहावीनंतर करियरच्या संधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT