Sakal Vidya Education Expo 2024 sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vidya Education Expo : एकाच ठिकाणी करिअरच्या शंभराहून अधिक संधी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’ने दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो-२०२४’चे आयोजन केले आहे. काळेवाडीतील रागा पॅलेसमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ८) सकाळी अकरा वाजता होणार आहे. रविवारपर्यंत (ता. ९) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या शंभराहून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळेल.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट प्रस्तुत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ चे मॅट्रिस सायन्स ॲकॅडमी हे प्रायोजक आहेत. तर एमआयटी कॅम्पस, आळंदी हे सहप्रायोजक आहेत. शहरातील तीसहून अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती देतानाच विद्यार्थी आणि पालकांसाठी तज्ज्ञांची मार्गदर्शनपर चर्चासत्रे होणार आहेत.

दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या बहुविध पर्यायाची माहिती, याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल. त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळेल.

काय?, केव्हा?, कधी?, कुठे?

  • काय? - सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४

  • कधी? - शनिवार ता. ८ आणि रविवार ता. ९ जून

  • केव्हा?- सकाळी ११ ते रात्री ८

  • कुठे? - रागा पॅलेस, संत मदर तेरेसा पुलाजवळ, काळेवाडी

अधिक माहितीसाठी -

अमोल ८३७८९८७८३६ आणि सचिन ९७३०९५९६९९

अच्युत गोडबोले करणार मार्गदर्शन

प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे ‘ए.आय. : उद्याच्या जगातील बदलते तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्‍यांनी आय.आय.टी. मुंबईमधून केमिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड आणि अमेरिका इथे ३२ वर्षं अनुभव आणि त्यातली २३ वर्षे हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेल्या जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वोच्च पदांचा अनुभव आहे. तंत्रज्ञान- संगणकयुग अशा विविध विषयांवर ५४ पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.

आज होणार उद्घाटन

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे उद््घाटन पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्स्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते सकाळी सव्वाअकरा वाजता होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा (पीसीईटी) नावलौकिक जागतिक पातळीवर आहे. या प्रदर्शनाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थी आणि पालकांनी घेतला पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्थाचालक म्हणतात...

‘सकाळ विद्या एक्स्पो’ हे प्रदर्शन विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावी आणि बारावी श्रेणी पूर्ण केल्यानंतर उपलब्ध करिअर विकल्पांची अनेक संधी देते. डॉ. डी. वाय पाटील प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी डॉ. डी. वाय पाटील शैक्षणिक संकुल हा संपूर्ण शैक्षणिक परिसर विकसित करण्यासाठी प्रयत्न केले.

- तेजस पाटील, विश्‍वस्त, डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी

‘सकाळ’च्या शैक्षणिक प्रदर्शनात आगामी काळातील अभ्यासक्रमाची माहिती मिळते. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध चर्चासत्रांतून मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाबरोबरच करिअर निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

- डॉ. दीपक शहा, संस्थापक, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

‘सकाळच्या एक्स्पो’च्या माध्यमातून विद्यार्थांना शैक्षणिक संस्थांची व करिअरविषयक माहितीसाठी एक प्लॅाटफॅार्म उपलब्ध केला आहे. कोटा क्लासेसमुळे महाराष्ट्रीयन मुलांचा आयआयटी, जेईई, एनइएफटी, आयसरसारख्या देशपातळीवरील संस्थांमध्ये टक्का वाढवण्याच्या हेतूने पुण्यातील मित्रमंडळ कॉलनी येथे ॲकॅडमीची सुरुवात झाली आहे.’’

-प्रा. श्यामसुंदर कुलकर्णी, संचालक, रेजोनन्स इन्स्टिट्यूट पुणे

‘देशाचे भवितव्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्याची अचूक वाटचाल करण्यासाठी ‘नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी’उत्तम पर्याय आहे. या युनिव्हर्सिटीमधून विद्यार्थी एमटेक, पीएचडीचे शिक्षण घेऊ शकतात. या पर्यायांची निवड करण्यासाठी ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’च्या माध्यमातून अचूक व अनमोल मार्गदर्शन करण्यात येते. पुढील शिक्षणासाठी, व्यवसायासाठी सुयोग्य पर्यायाची निवड व करिअर मार्गदर्शनासाठी सल्ला या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमाद्वारे चालू असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.’’

- डॉ. अरविंदकुमार सक्सेना, संचालक, नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT