Sakal-Vidya sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vidya : अकरावीसाठी कोणता निर्णय घ्यावा? चिंचवडमध्ये रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अकरावी, बारावीच्या अभ्यासाबरोबरच सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षांची तयारी व अभ्यासाचे नियोजन कसे करावे? येणाऱ्या काळात अभ्यासक्रमात होणारे बदल? याविषयी पालक चिंताग्रस्त आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - अकरावी, बारावीच्या अभ्यासाबरोबरच सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षांची तयारी व अभ्यासाचे नियोजन कसे करावे? येणाऱ्या काळात अभ्यासक्रमात होणारे बदल? याविषयी पालक चिंताग्रस्त आहेत. दहावीतून अकरावीला जाताना पालकांनी नेमक्या कोणत्या शाखेला पसंती द्यावी, देशभरातील नामांकित संस्था कोणत्या आहेत?

सहावीपासूनच राज्य व राष्‍ट्रीय पातळीवरील परीक्षांची तयारी का व कशी करावी? अशा प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला ‘सकाळ विद्या’ आणि ‘एक्‍सिड’च्या (एक्‍सलंट एज्युकेशन) माध्यमातून होणाऱ्या मार्गदर्शन चर्चासत्रातून मिळणार आहेत. रविवारी (ता. १२) सकाळी नऊला चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हे चर्चासत्र होणार आहे.

या चर्चासत्रात सहावीपासूनच एनएसओ, आयएमओ, एनटीएसई, होमी भाभा या परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम, त्यांची तयारी का व कशी करावी? राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी का व कशी करावी? इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेतील परीक्षांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. सहावी ते दहावीपासूनच तयारीला लागलो तर बारावीमध्ये अभ्यासाचा ताण कसा कमी होऊ शकतो.

सीईटी, जेईई, नीट परीक्षांची तयारी, अभ्यासक्रमाचे नियोजन, बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय आणि त्यातील शिक्षण घेण्यासाठी देशातील नामांकित संस्था आयआयटी, एनआयटी, बीआयटी, व्हीआयटी, आयआयएससी, आयआयएसईआर, एनआयएसईआर व त्यांची प्रवेश प्रक्रिया याबाबतच्या शंकांचे निरसन चर्चासत्रातून होणार आहे.

यामध्ये दहावी, अकरावी, बारावीसह सहावी ते नववीपर्यंतचे विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात. विद्यार्थी व पालकांच्या करिअर व प्रवेश परीक्षांतील बदलांविषयीच्या सर्व शंका व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.

काय? - कधी? केव्हा? कुठे?

काय? - स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रम तयारी

कधी? - रविवारी १२ मे २०२४

केव्हा? - सकाळी ९ वाजता

कुठे? - प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

प्रवेश - विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

नावनोंदणी निश्चित करण्यासाठी संपर्क करा

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

संपर्क - ८३७८९८७८३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT