Saath Chal sakal
पिंपरी-चिंचवड

Saath Chal : जलसंवर्धनाच्या जागरासाठी आज पिंपरीत ‘साथ चल’; वारी विठुरायाची अन् जलसंवर्धनाची

पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (ता. ३०) ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रम राबविण्‍यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (ता. ३०) ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यासह ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होत जलसंवर्धनाचा जागर करण्याचा निर्धार शहरवासीयांना केला आहे.

सकाळी पिंपरीमधील मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत होणार आहे. या उपक्रमाला देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान व आळंदी येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे सहकार्य लाभले आहे.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या आषाढी वारीत ‘साथ चल’ या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांच्या साक्षीने ‘वारी विठुरायाची अन् जलसंवर्धनाची’ या उपक्रमात रविवारी (ता. ३०) पिंपरीत आणि मंगळवारी (ता. २) पुण्यात जलसंवर्धनाचा जागर केला जाणार आहे. या अंतर्गत पिंपरीमध्ये रविवारी पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेदरम्यान सोहळा होणार आहे.

फिनोलेक्स कंपनी प्रवेशद्वाराजवळ फिनोलेक्स कंपनीचे प्रमुख अमित माथुर यांच्या उपस्थितीत भाविकांसमवेत जलसंवर्धनबाबतची शपथ घेण्यात येणार आहे. त्यानंतर सोहळ्यात वारकरी दिंडीसमवेत उपस्थित नागरिकांची प्रबोधन दिंडी फिनोलेक्स कंपनी प्रवेशद्वारापासून निघून ती एचए कंपनी वसाहतीजवळ चालत जाईल. एचए कंपनी वसाहत केंद्राजवळ पुन्हा जलसंवर्धनबाबतची शपथ घेतल्यानंतर ‘साथ चल’ उपक्रमाची सांगता होणार आहे.

पुण्यात मंगळवारी ‘साथ चल’

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळे मंगळवारी (ता.२) पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. त्यावेळी सकाळी सात वाजता पुणे कॅम्पातील महात्मा गांधी बसस्थानकात (पूल गेट) ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. तिथे भाविकांना ‘जल संवर्धनाची’ शपथ दिली जाईल. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT