sant tukaram maharaj paduka sakal
पिंपरी-चिंचवड

Sant Tukaram Maharaj Palkhi : देहू, आळंदी भक्तिरसात चिंब

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दुपारी अडीच वाजता येथील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

सकाळ वृत्तसेवा

देहू - संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ।।१।। जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी ये ।।२।।

या अभंगातील ओवीप्रमाणे आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा नामघोष करत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवला. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. त्यामुळे अवघी देहूनगरी विठुमय हाऊन भक्तिरसात चिंब झाली होती.

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दुपारी अडीच वाजता येथील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी देऊळवाडा परिसरात पहाटेपासून गर्दी केली होती. प्रस्थानासाठी वारकऱ्यांची पावले देऊळवाड्याकडे पडत होती. सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर, हवेत गारवा आणि ढगाळ हवामान राहिले. संपूर्ण देऊळवाड्याला फुलांची सजावट करण्यात आली होती.

महाद्वारामधून मानाच्या दिंड्यांना प्रवेश

सोहळ्याची वेळ जवळ येताच गेल्या दोन दिवसांपासून गावात असलेल्या वारकरी, दिंड्या देऊळवाड्याच्या महाद्वाराजवळ आल्या. प्रथम मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. देऊळवाड्यात दर्शनासाठी रांग होती. विठुनामाच्या गजराने आसमंत दुमदुमन गेला होता.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घोडेकर बंधू यांच्या घरातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका इनामदारवाड्यात आणण्यात आल्या. त्यानंतर, पालखी सोहळ्यातील मानकरी मसलेकर यांनी डोक्यावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका इनामदारवाड्यात आणल्या. दुपारी दोन वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरूवात झाली.

देऊळवाड्याबाहेरही भाविकांची गर्दी

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देऊळवाड्याबाहेर दिंड्या आणि भाविकांनी गर्दी केली होती. यंदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने गर्दी नियंत्रणात होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, देऊळवाडा, वैकुंठस्थान, गाथा मंदिर या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देऊळवाड्यात पालखी प्रदक्षिणा

दुपारी पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. देऊळवाड्यात पालखी प्रदक्षिणेसाठी निघाली. टिळेकर, भिंगारदिवे, देशमुख, गिराम, कळमकर, पवार, कांबळे, पांडे हे सेवेकरी, मानकरी, चोपदार पालखीसोबत होते. प्रदक्षिणा सुरू असताना टाळ मृदंगाचा झंकार निनादला.

ज्ञानोबा - तुकारामचा नामघोष आणि विठूचा गजर करत वारकरी फुगड्या धरू लागले. मानाच्या दिंड्या प्रदक्षिणेसाठी पालखी सोबत होत्या. मानाचे अश्व, खाद्यांवर गरुडटक्के आणि हातात घेतलेले चोप, अब्दागिरी अशा दिमाखात पालखीने प्रदक्षिणा केली. त्यानंतर, पालखी इनामदारवाड्याकडे मुक्कामी गेली.

गावात चौकाचौकांत गर्दी

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या संत तुकाराम महाराजांच्या राहत्या घरापर्यंत रांगा लागल्या होत्या. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, बाजारपेठ मार्ग, ग्रामपंचायत कार्यालय रस्ता, गाथा मंदिर परिसरात वारकऱ्यांनी गर्दी केली होती.

भाविक, वारकऱ्यांसाठी भाकऱ्या

देहूत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अन्न मिळावे यासाठी देहूतील ग्रामस्थ गेले दोन दिवस अन्नदान करत आहेत. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, नवशा गणपती मित्र मंडळ, माळवाडी येथील हनुमान मंदिर, भैरवनाथ अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांना भाकरी करून देण्याचे काम गावातील महिलांनी केले. देहू इंजिनिअरिंग इंडिया प्रा.लिमिटेडच्या कामगारांनी चहा, बिस्किटे, फळांचे वाटप केले.

माळवाडी बेबी महिला बचत गटाच्यावतीने माळवाडी येथे अन्नदान करण्यात आले. देहूरोड येथील वैश्य समाज मंडळ आणि व्यापाऱ्यांच्यावतीने पहाटे दहा हजार वारकऱ्यांना चहाचे वाटप चौदा टाळकरी कमानीजवळ करण्यात आले. विशाल खंडेलवाल यांनी नियोजन केले.

प्रशासनाचे सहकार्य

वारीसाठी देहू नगरपंचायत प्रशासन, आरोग्य केंद्र, वीज वितरण कंपनी,पोलिस यंत्रणा यांनी चोख व्यवस्था केली होती.देहूच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, नगराध्यक्षा पूजा दिवटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव, दिनेश नरवडे, तलाठी सूर्यकांत काळे, पोलिस निरिक्षक विजय वाघमारे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT