कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
पिंपरी - कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सर्व शाळा बंद (School Close) ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी (Commissioner) दिले आहेत. मात्र त्यांचा आदेश डावलून काही सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) शाळांनी विद्यार्थी (Student) बोलावून वर्ग (Class) सुरु ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आयुक्तांनी रात्री उशिरा या निर्णयाचा आदेश जारी केल्यामुळे शाळांपर्यंत उशिरा पोहोचल्याचे काही शाळांचे म्हणणे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आल्यावर ३० जानेवारीपर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रात्री उशिरा या निर्णयाचा आदेश जारी केला. पण हा आदेश शाळांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे जाहीर केल्यानंतरही बुधवारी निगडी, प्राधिकरण, पिंपरीगाव, चिंचवड अशा परिसरातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत शाळांना परिपत्रक पाठविणे गरजेचे होते, पण ही माहिती शाळांपर्यंत गेलीच नसल्याने सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक शाळांवर आले. पण आजपासून बंद असल्याचे प्रवेशद्वारावर सांगण्यात आल्याने विद्यार्थी आल्यापावली परतले.
मराठी आणि इंग्रजी माध्यम व सीबीएसई बोर्डाच्या मुख्याध्यापकांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. शिक्षण विभाग सकाळी बारा वाजले तरी झोपा काढते काय? शाळा बंद झाल्या आहेत हे विद्यार्थी व शिक्षकांना कोण सांगणार? असा सवाल या निमित्ताने पालकांनी उपस्थित केला. कोरोनाच्या धास्तीने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास राजी नसतानाही शाळा प्रशासन मुलांच्या शैक्षणिक नुकसानीची भीती दाखवतात. मुले शाळेत दाखल करून घेण्यास हरकत नाही, असे लेखी घेऊन शाळेत पाठवण्यास भाग पाडले. कोरोग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता इतक्यात शाळा उघडू नयेत, अशी प्रतिक्रिया पालक संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.
‘शाळा बंद करण्याविषयी महापालिका प्रशासनाकडून उशिरा आदेश प्राप्त झाले. नेहमीप्रमाणे आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले. पुन्हा एकदा मुलांचे ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे.’
- अश्विनी कुलकर्णी, संचालिका सिटी प्राइड स्कूल, प्राधिकरण
‘याबाबत माहिती मिळताच बहुतांश शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यास जाणार आहे. मंगळवारी मुख्याध्यापकांना शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
- अनिता जोशी, पर्यवेक्षिका महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.