The school van driver honestly return the lost wallet even in the financial difficulties 
पिंपरी-चिंचवड

प्रामाणिकपणा असावा तर असा! आर्थिक चणचणीच्या काळातही हाती आलेले पैसे केले परत

मिलिंद संधान

नवी सांगवी(पुणे) : तीन महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे आयटी अभियंत्यांपासून ते अगदी तळागाळातल्या मजुरांना नोकरी आणि रोजगार गमवावा लागला आहे. यातून उद्भवलेल्या आर्थिक चणचणीतून गृहकलह व ताणतणावातून आत्महत्यांसारख्या गोष्टीं वाढल्या. श्रीमंतांना पुर्वीची आर्थिक बचत कामाला येत असली तरी रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या वाट्याला कमालीचे नैराश्य आणि वैफल्य वाट्याला येत आहे. परंतु अशाच एका पिंपळे गुरव येथील स्कूल व्हॅनवाल्या काकांचा प्रामाणिकपणा आपल्या सर्वांना या नकारात्मकतेच्या काळात  नैतिकपणाचे बळ देऊन नवी उर्मी देतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

शुक्रवार(ता.3) रात्री दहाच्या दरम्यान प्रविण पवार हे अभियंता गृहस्थ पूजा हॉस्पिटलसमोर फोनवर बोलत उभे होते. त्यांनी त्यांच्या हातातील पाकीट शेजारील सिमेंटच्या पाईपवर ठेवले होते आणि काही काळानंतर प्रविण फोनवर बोलत बोलत ते पाकीट तेथेच विसरून पुढे घरी निघून गेले. त्याच दरम्यान स्कूल व्हॅन चालविणारे नितिन नवले हे ही तेथून चालले होते. त्यांचे लक्ष त्या पाकिटावर गेले व कोणीतरी हे विसरून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ते पाकिट उचलले आणि आजुबाजुला विचारणा केली. परंतु कोणाचाही प्रतिसाद न मिळाल्यावर त्यांनी ते पाकीट उघडले तर त्यात चार हजार रूपये व क्रेडीड आणि डेबिट कार्ड होते. 

पेट्रोल-डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

चार महिन्यांपासून नवलेंची स्कूल व्हॅन बंद असल्याने ते मोठ्या आर्थिक चणचणीतून जात आहे. अशा वेळी ऐवढे मोठे घबाड पाहिल्यानंतर कोणाचीही नियत फिरल्याशिवाय राहिली नसती. परंतु मनाने गर्भश्रीमंत असलेल्या नवले यांना हाव आणि लोभ याचा थोडाही गंध लागला नाही. त्यांनी पाकिट निरखून चाळायला सुरूवात केली; कोणाचे असावे हे यासाठी काही सुगावा लागतोय का हे पाहू लागले. तेंव्हा त्यात डॉक्टरांची औषधोपचाराची चिठ्ठी त्यात दिसली व त्यावर प्रविण यांचाही नंबर डॉक्टरांनी लिहला होता. त्यानंबरवर लागलीच नवले यांनी संपर्क साधला व प्रविण यांच्या हातात त्यांचे पाकीट सुपुर्त केले. आणि प्रविण यांनीही नवले यांचे मनःपुर्वक आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. 

कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार...

वार्षिक परिक्षांच्या काळात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्हॅनचे भाडे शंभर टक्के वसुल होत असते. परंतु त्याच दरम्यान शाळाबंद झाल्याने स्कूल व्हॅनवाल्या काकांचीच आर्थिक विवंचनेतून परिक्षा सुरू झाली. परंतु ही परिक्षा नवले काका प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले हे नक्कीच म्हणता येईल.

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT