Shopping-Mall 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दुकाने-हॉटेल रात्री १० पर्यंत खुली राहणार

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश

पिंताबर लोहार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व दुकाने, उपहारगृहे, मॉल्स रविवारपासून (ता. १५) सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. मात्र, त्यांचे सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असावे. लशीचा पहिला डोस घतलेला असावा. तसेच, दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक राहील, असा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढला आहे.

लोकल ट्रेन सुविधा सुरू

आरोग्य अधिकारी, कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा ( डोस ) घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेन प्रवास करता येईल. ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहे; त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे लसीकरण प्रमाणपत्र व आस्थापनांच्या ओळखपत्रासह स्वतंत्रपणे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत विहीत कार्यपध्दतीने (ऑनलाईन /ऑफलाईन) प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकल ट्रेन प्रवासासाठी मासिक, त्रैमासिक पास देण्यात यावेत. (असे प्रमाणित ओळखपत्र प्राप्त करण्याबाबतच्या तपशीलवार व स्वयंस्पष्ट सूचना प्राधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे प्रसारीत करण्यात येत आहेत) काही रेल्वे तिकिट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ज्या प्रवाशाकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून ओळखपत्र खोटे आढळल्यास त्याच्याकडून तसेच ज्याना खाटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांचेकडून ५०० रुपये दंड व भारतीय संहिता १८६० नुसार कारवाई करण्यात यावी.

उपहारगृहे…

खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने पुढील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

  • उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधित मास्कचा वापर अनिवार्य राहील. या बाबतच्या स्पष्ट सूचना आस्थापनाने लावणे आवश्यक राहील.

  • आचारी, वाढपे, व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लसीकरण आवश्यक राहील. त्याचबरोबर मास्कचा वापर अनिवार्य राहील.

  • वातानुकूलित उपहारगृह व बार असल्यास वायूविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक.

  • प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट पंखा आवश्यक.

  • शारीरिक अंतराचे पालन करणारी आसन व्यवस्था आवश्यक.

  • निर्जंतुकीकरणाची तसेच सेनिटायझरची व्यवस्था आवश्यक.

  • सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी रात्री ९ वाजेपर्यंत घ्यावी. मात्र, पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्यास मुभा.

दुकाने…

शहरातील सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक.

शॉपिंग मॉल्स…

सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरु राहण्यास मुभा देण्यात येत असून काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन, कर्मचारी व प्रवेश करणाऱ्या नागरिकांचेही कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले आवश्यक. लसीकरण प्रमाणपत्र फोटो ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक.

जिम्नशियम, योगा सेंटर, सलून-स्पा…

वातानुकूलित, विनावातानुकूलित जिम्नशियम, योग सेंटर, सलून-स्पा ५०% क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा. संस्था वातानुकूलित असल्यास वायूविजनासाठी पंखा व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक.

इनडोअर स्पोर्टस्…

खेळाडूंचे, तेथील कर्मचारी, व्यवस्थापन यांच्या कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक. हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायूविजन असणे आवश्यक. बेडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वश, पेरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्यास मुभा.

कार्यालय, उद्योग व सेवा विषयक आस्थापना…

सर्व शासकीय/निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल, त्या पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा. गर्दी टाळण्यासाठी आस्थापनांनी विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. ज्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना घरुन काम करणे शक्य आहे, अशांना तशी मुभा द्यावी. कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्यावेळी प्रवासा टाळणे शक्य होईल असे वेळेचे व्यवस्थापन करावे. खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरु ठेवण्याची मुभा. अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या ५० टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक.

उद्याने…

विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाहसोहळे…

  • खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे संपूर्ण पालन होईल, या अटीवर मुभा.

  • खुल्या प्रांगण, लॉनवरील विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५०% परंतु, जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.

  • बंदिस्त मंगल कार्यालये, हॉटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के परंतु, जास्तीत जास्त १०० व्यक्ती.

  • कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी व्हीडीओ रेकाँर्डींग करणे व आवश्यकतेनुसार संबंधित प्राधिकाऱ्याला उपलब्ध करुन देणे आवश्यक. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडनीय कारवाई तसेच परवाना रद्द करण्याची कार्यवाही.

  • मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन, भोजन व्यवस्थापन, बँड पथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह संस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही लसीकरण आवश्यक.

आठवडे बाजार…

चालू करण्यास मंजुरी. विक्रेत्यांचे लसीकरण गरजेचे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, क्लासेस, अभ्यासिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, क्लासेस व अभ्यासिका हे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. (सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण किमान एक डोस) अनिवार्य आहे.

सिनेमागृहे व मल्टीफ्लेक्स, धार्मिक स्थळे

सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिफ्लेक्स (स्वतंत्र तसेच मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद.

धार्मिक स्थळे…पुढील आदेशापर्यंत बंद.

आंतरराज्य प्रवास….

लसीकरण झालेल्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआर ची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक.

गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्रशासन तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार…

गर्दी व जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रेली मोर्चे यावर निर्बंध कायम.

मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादित असल्याने, जर रुग्णसंख्या वाढल्यास व उपचारासाठी प्रतिदिन ७०० मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास तात्काळ लॉककडाऊन घोषित करुन कठोर निर्बंध लागू होतील. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध इत्यादीचे पालन करणे अनिवार्य.

सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक, व्यवस्थापनांने कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत यादी तयार ठेवावी.

दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्स, कार्यालये, औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालिक निर्जंतुकीकरण व सेनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधिताची असेल. कर्मचारी, ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड/कान्टक्टलेस थर्मामीटर याची व्यवस्था करावी. मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट जमा करण्याची व विहित कार्यपद्धतीने विल्हेवाटीसाठी देण्याची संबंधितांची जबाबदारी असेल.

वरील आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथ रोग अधिनियम आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा या आदेशात आयुक्तांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT