हिंजवडी - आयटी सेक्टर असलेल्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे व बावधन परिसरात आता कोरोनाचा फैलाव वाढू लागला असून, शनिवारी (ता. ४) या भागात एकूण 6 कोरोनाबधित रुग्ण सापडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे व गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या सहा पैकी तीन रुग्णांना काहीच लक्षणे नसतानाही त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व चिंतेचे वातावरण आहे. सहा जणांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे, तर चार पुरुष आहेत.
हिंजवडीतील एका पिजीमध्ये राहणाऱ्या आयटीयन्सला कोरोनाची लागण झाली आहे. तर हिंजवडीत आणखी एका सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीलाही कोणतीही लक्षण नसताना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा अपघात झाला म्हणून त्याची टेस्ट केली असता, तो संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एका गरोदर महिलेने प्रसूतीपूर्व टेस्ट केली असता, तिचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.
माण गावात देखील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय मारुंजी व बावधन मधील एका एका पुरुषांना कोरोना झाला आहे. या सर्वांच्या सहवासात आलेल्या कुटुंबीयांना होम क्वारंटाइन केले असून, प्रशासनाने तो भाग सील केला आहे.
दरम्यान, शनिवारी मुळशी तालुक्यात एकूण आठ रुग्ण मिळाल्याचे जठार यांनी सांगितले. त्यामुळे मुळशीतील रुग्णाची संख्या आता शंभरीच्या आसपास गेली आहे. किंबहुना नेरे गावातही काही रुग्ण मिळाले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांची माहिती व अहवाल न मिळाल्याने रुग्णांचा नेमका आकडा समजू शकला नाही. त्यात काही रुग्ण थेट पुणे व पिंपरी चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल होत असल्याने आकडेवारीत तफावत येत असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.