थेरगाव : श्रीकृष्ण कॉलनी येथे टेरेसवर दमदार आलेली स्ट्रॉबेरीची शेती. 
पिंपरी-चिंचवड

सिमेंटच्या जंगलात स्ट्रॉबेरीचे पीक

सुवर्णा नवले

पिंपरी - स्ट्रॉबेरी, लुसलुसीत व लालचुटुक दिसणारे फळ. विशेषतः पाचगणी व महाबळेश्‍वर परिसरात उत्पादन घेतले जाणारे. पण, याच स्ट्रॉबेरीचे पिक आता सिमेंटच्या जंगलात अर्थात औद्योगिकनगरीत घेतले जाऊ लागले आहे. तेही टेरेसबागेत व अंगणात. छोट्याशा जागेचा व सेंद्रीय खतांचा वापर करून. ही स्ट्रॉबेरी वाल्हेकरवाडी, इंद्रायणीनगर, निगडी, थेरगाव, आकुर्डी आदी भागात बघायला मिळत आहे. 

अवघ्या तीनशे ते साडतीनशे स्क्वेअर फूट जागेत कुटुंबाला पुरेल व विक्रीही करता येईल इतके स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे, असे बागप्रेमी सांगत आहेत. काही जण दोन ते तीन वर्षांपासून सलग स्ट्रॉबेरीचे पीक घेत असून काहींनी हौस म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्ट्रॉबेरी लागवडीची पद्धत
शहरात हायड्रोफोनिक पद्धतीने शेती केली जात आहे. म्हणजे भूपृष्ठापासून मातीविरहीत शेतीची लागवड. ही केवळ पाण्यावर केली जाते. केवळ कोकोपीठ यासाठी वापरले जाते. ही शेती थर्माकोल (कोनीकल पॉट) कुंड्यामध्ये किंवा ट्रबमध्ये केली जाते. एका कुंडीत चार रोपांची लागवड होते. उभ्या व आडव्या पद्धतीचे पीक घेतले जाते. हे सर्व लोखंडी स्टॅंडवर उभे केले जाते. ठिबक सिंचनचा वापर करण्यात येतो. दिवसातून किमान दोन-तीन वेळा पाणी द्यावे लागते. यामध्ये काही इस्राईल पद्धतीच्या शेतीचे धोरण अवलंबण्यात आले आहे. 

पारंपरिकपेक्षा सोईचे
काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड केली जाते. नांगरट किंवा गादी वाफे घेतले जातात. यासाठी मनुष्यबळ व कीटकनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. प्लॅस्टिक मलचिंगचाही खर्च वाढतो. याउलट हायड्रोफोनिक शेतीत कमीत कमी जागेत जास्त रोपांची लागवड होते. रोगांचा प्रादूर्भाव होत नाही. खर्चही कमी येतो. दर्जेदार उत्पादन घेता येते. मनुष्यबळ कमी व बदलत्या वातावरणाचा परिणाम होत नाही. यामुहे शहरवासियांचा स्ट्रॉबेरी करण्याकडे कल वाढला आहे.

साधारणत: एक एकर शेतीत २० हजार रोपांची लागवड होते. यातून सरासरी १२ ते १३ टन उत्पन्न मिळते. एका गुंठ्यासाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. कामाचा ताण येत नाही. पाण्याची बचत होते. खतांचा खर्च ६० टक्के होतो. यामध्ये पाच ते सात स्तरांमध्ये शेती करता येते. वाया जाणाऱ्या पाण्यावरही इतर शेती घेता येते. मी इतर फळझाडे व बीटवर्गीय पिके घेतली आहेत.
- अनिल दुधाणे, स्ट्रॉबेरी उत्पादक प्रेमी व अभियंता, थेरगाव

मी कुंड्यांमध्ये रोपे लावली. पालापाचोळा, कोकोपीठ, दहा टक्के कंपोस्ट, निंबोळी पेंड, बोनमील करून स्ट्रॉबेरी केली आहे. जीवामृताचा अधूनमधून वापर करते. केळांच्या सालीचे पाणी व मॅग्नेशिअम सल्फेट वापरते. त्यामुळे कुंड्यांमध्येही स्ट्रॉबेरी बहरली आहे. 
- मनीषा माळी, बागप्रेमी, वाल्हेकरवाडी

Edited By - Prashant Pati

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT