पिंपरी-चिंचवड

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानेच उचलले हे कठोर पाऊल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दहा दिवसांपूर्वी लागलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंजवडी जवळील जांबे येथे  घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 

अनिकेत गणेश जगताप (वय 17, रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. अनिकेत हा रविवारी (ता. 9) दुपारी साडेतीनच्या सुमारास राहत्या घराच्या एका खोलीत होता. त्यावेळी त्याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळानंतर त्याच्या आजोबांना ही घटना समजताच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनिकेत याने दहावीची परीक्षा दिली होती. दहा दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात त्याला चांगले गुणही मिळाले होते. अकरावीमध्ये प्रवेश घेण्याची तयारीही सुरू असतानाच त्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

Solapur Crime: राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... बैठकीनंतर BCCI करणार मोठी घोषणा?

Nicholas Pooran ने मोडला पाकिस्तानच्या रिझवानचा मोठा विक्रम! २०२४ वर्षात ठरला नंबर वन

Latest Maharashtra News Live Updates : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 66 लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT