Vegetable Market Sakal
पिंपरी-चिंचवड

तळेगाव-स्टेशन रस्त्याने घेतला मोकळा श्वास

रस्त्याकडेला ठिकठिकाणी बसणाऱ्या फळभाजी विक्रेत्यांचीआमदार सुनील शेळके यांनी खासगी जागेवर मंडप टाकून सोय केली.

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - जिजामाता चौक ते स्टेशन चौक दरम्यान रस्त्याकडेला ठिकठिकाणी बसणाऱ्या फळभाजी विक्रेत्यांची (Vegetable Seller) आमदार सुनील शेळके (Sunil Shelake) यांनी एसटी डेपोसमोरील खासगी जागेवर मंडप (Mandap) टाकून सोय केल्याने ऐन कोरोना काळात होणारी गर्दी (Crowd) कमी झाली आहे. परिणामी, तळेगाव-स्टेशन रस्त्याने घेतला मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. (Talegaon Station Road Vegetable Market Crowd Coronavirus Lockdown)

‘प्रशानसाचा अंकुश हवा’

बेशिस्त, विनापरवाना विक्रेत्यांवर हवा अंकुश चाकण रस्त्यावरील, शर्मा कॉम्प्लेक्स समोरील जुन्या भाजी मंडईच्या जागेवर आणि यशवंतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह वराळे रस्त्यावर बसणाऱ्या फळभाजी विक्रेत्यांवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. या ठिकाणचे फळभाजी विक्रेते कुठलीही सुरक्षाविषयक काळजी घेताना दिसत नाहीत. कारवाईसाठी लोकप्रतिनिधींना काही मर्यादा पडतात. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगावात संसर्ग रोखण्यासाठी बेशिस्त, विनापरवाना विक्रेत्यांवर नगर परिषद प्रशासनाचा अंकुश हवा, अशी अपेक्षा नगरसेवक निखिल भगत यांनी व्यक्त केली.

सद्यःस्थिती

  • गतवर्षीच्या लॉकडाउनपासून नगर परिषद हद्दीत विनापरवाना फळभाजी विक्रेत्यांची संख्या वाढली

  • तळेगावातील विविध ठिकाणचे फळभाजी विक्रेते एकत्र केले तर त्यांची संख्या आठवडे बाजारापेक्षा मोठी

  • परगावाहून आलेल्या विक्रेत्यांची संख्या लक्षणीय

  • विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचे आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत

  • नगर परिषदेच्या भरारी पथकाकडून जुजबी समज

  • गर्दीतून कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची भीती अधिक

  • जिजामाता चौक ते स्टेशन चौक दरम्यानच्या विक्रेत्यांनी रस्त्याला गराडा

  • दररोज वाहतूक कोंडीचा सामना

काय केल्या उपाययोजना

  • संभाव्य गर्दी टाळण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार

  • पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी डेपोसमोरील एका खासगी भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचा उभारला मंडप

  • विक्रेत्यांना उपलब्ध करून दिली जागा

  • नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाईचे व्यापक नियोजन

  • जिजामाता चौक ते स्टेशन चौक दरम्यान रस्त्यावर बसण्यास विक्रेत्यांना कडक प्रतिबंध

  • नवीन पर्यायी ठिकाणी विक्रेते रांगेत बसविल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन

विनापरवाना आणि दररोज नवीन येणाऱ्या किती विक्रेत्यांना प्रशासन जागा देणार? नगरपरिषदेने फक्त स्थानिक आणि वर्षानुवर्षे फळभाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना परवाना आणि मुभा द्यावी. बेशिस्त विक्रेते आणि गर्दीवर नियंत्रण ठेवावे.

- प्रमोद देशक, नागरिक, यशवंतनगर

नगर परिषद हद्दीत इतर ठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या अधिकृत फळभाजी विक्रेत्यांना देखील पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. कारवाईत सातत्य राहावे म्हणून भरारी पथक सकाळी सात ते अकरा या वेळेत प्रकर्षाने कार्यरत ठेऊन बेशिस्त विक्रेत्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे.

- श्याम पोशेट्टी, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगर परिषद

तळेगावसह लोणावळ्यातील स्थानिक भाजी विक्रेत्यांना प्राधान्याने नगर परिषदेच्या माध्यमातून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोरोनापासून मावळवासीयांच्या बचावासाठी सर्वांनी नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- सुनील शेळके, आमदार, मावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT