पिंपरी - ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत महापालिकेने विविध सुविधा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. या ‘टेक्नॉसेव्ही’मुळे महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष न जाता किंवा नागरी सुविधा केंद्रात वा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर न करता केवळ एका ‘क्लिक’वर अर्थात मोबाईलचा वापर करून सुविधांचा लाभ मिळत आहे. या ‘टेक्नॉसेव्ही’मुळे नागरिकांचा वेळ आणि येण्या-जाण्याचा त्रास वाचत आहे. घरबसल्या मिळकतकर असेल वा कोणतीही तक्रार वा अर्ज देता येत आहे.
वाय-फाय सुविधा
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध कार्यालयांना वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत मुख्य कार्यालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सेवा उपलब्ध आहे. इतर कार्यालयांत वाय-फाय कार्यान्वित केले जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांना सुविधेचा लाभ मिळणार आहे.
मोबाईल क्रमांक रजिस्टर केल्यानंतर ओटीपी मिळेल, त्याद्वारे नागरिकांना वाय-फाय सुविधेचा लाभ घेता येईल. शहरात २१५ ठिकाणी वाय-फाय यंत्रणा आहे, पैकी ८७ ठिकाणी सुरू आहे. ७६० ॲक्सेस पॉइंटपैकी ३५७ पॉइंट सुरू केले आहेत.
सिटिझन जिओपोर्टल
नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ करणे आणि महापालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने एका क्लिकवर इत्थंभूत सेवांची माहिती देण्यासाठी ‘सिटिझन जिओपोर्टल’ सुरू केले आहे. यामध्ये सहा सॅप मॉड्यूल्स, २५ नॉन-कोर आयटी ॲप्लिकेशन्स, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा समावेश आहे. जिओपोर्टल सुविधा https://smartgisda.pcmcindia.gov.in/CitizenPortal/ या लिंकवर तसेच महापालिकेच्या pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ‘आपले शहर जाणून घ्या’ आयकॉन अंतर्गत उपलब्ध आहेत.
‘स्मार्ट सारथी अॅप’
केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट अवॉर्डमध्ये ‘गव्हर्नन्स’ श्रेणीत स्मार्ट सिटीच्या ‘स्मार्ट सारथी अॅप’ने देशात द्वितीय स्थान पटकाविले आहे. ‘स्मार्ट सारथी ॲप’ हा दूरदर्शी डिजिटल उपक्रम आहे. ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी प्लॅटफॉर्म’द्वारे ई-गव्हर्नन्सचा वापर तसेच नागरिक सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करत आहे. सध्या सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिक अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत.
मालमत्तांचे सर्वेक्षण
शहरातील सर्व मालमत्तांचे जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिम) सर्वेक्षण स्मार्ट सिटीमार्फत हाती घेतले आहे. त्याअंतर्गत पाच लाखांहून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. जीआयएस डेटा पीसीएमसी बांधकाम परवानगी आणि मालमत्ताकर विभाग यांच्याकडे उपलब्ध डेटाशी जोडला जाणार आहे.
यामुळे अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ता ओळखता येतील. त्यामुळे महसुलात वाढ होईल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. जीआयएस डेटाबेस सतत आणि रिअल टाइम आधारावर अपडेट करता येणार आहे. वीस आयटी ॲप्लिकेशन्स प्रथमतः सुरू होतील.
सीसीटीव्ही कॅमेरे
नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी विविध ठिकाणी सुमारे पाच हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांचा फायदा पोलिसांना होत आहे. गुन्हेगारांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. २३ ट्रॅफिक जंक्शनवर लाल सिग्नलचे उल्लंघन रोखण्यासाठी प्रणाली तयार केली आहे.
इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमअंतर्गत वाहतूक व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार सीसीटीव्हीसह चार प्रकारचे विशेष कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पब्लिक अॅड्रेस सिस्टीम (पीए सिस्टीम) १० ठिकाणी लावली आहे.
सुविधा ‘ऑन क्लिक’
कर भरणा
विवाह नोंदणी
जन्म-मृत्यू प्रमाणपत्र
नागरवस्ती योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज
तक्रार निवारण यंत्रणा
‘जीपीएस’चा वाप
आपत्कालीन वेळेत संपर्क
वेबिनार, चर्चासत्र
आरोग्य अभियानांची माहिती
शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी
विकास प्रकल्पांची माहिती
महापालिका शाळांचा स्तर वाढविणे
स्मार्ट सिटीज मिशन नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट सोल्यूशन्स’द्वारे शहरातील नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि टिकाऊ वातावरण आणि सुधारित जीवनमान प्रदान करून शहरी विकास पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शहरी विकासात एक आदर्श बदल साध्य करण्याच्या ध्येयाकडे या मिनशद्वारे महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या सुमारे दोन लाख वापरकर्ते अॅप, वेब पोर्टल आणि सोशल मीडिया चॅनेलद्वारे संवाद साधत आहेत.
- शेखर सिंह, महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.