pcmc sakal
पिंपरी-चिंचवड

Property Tax : मिळकतधारकांचा ऑनलाइनकडे कल; ७३ टक्के नागरिकांकडून ४३२ कोटी जमा

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी एकूण सहा लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेकडे सहा लाख ३० हजारांवर मिळकतींची नोंद आहे. त्यातील तीन लाख ५७ हजार ११ मिळकतधारकांनी एप्रिल ते जून कालावधीत अर्थात पहिल्या तिमाहीत ४३२ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. आतापर्यंत दोन लाख ६२ हजार ५२२ म्हणजेच मिळकतकर भरलेल्या एकूण मिळकतधारकांपैकी ७३ टक्के मिळकतधारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे.

शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी एकूण सहा लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नागरिकांनी मिळकतकर भरण्यासाठी महापालिका करसंकलन विभागाने विविध योजना राबविल्या. त्याचा यावर्षी आतापर्यंत ५४ टक्के मिळकतधारकांनी लाभ घेतल्याचे मिळकतकर भरण्यावरून दिसते.

दरम्यान, मिळकतकराची बिले वितरणासाठी यावर्षीही महापालिकेने ‘सिद्धी’ प्रकल्प राबविला. म्हणजेच बचतगटांच्या माध्यमातून मिळकतधारकांना बिले वेळेत मिळाली. परिणामी, नागरिकांना ३० जूनपर्यंत जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घेता आला.

शहरातील करदात्यांसाठी करसंकलन आणि करआकारणी विभागाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला आहे. त्यांनी करभरणा केल्याने महापालिकेकडे निधी उपलब्ध झाला आहे. राहिलेल्या नागरिकांनी वेळेत करभरणा करून शहराच्या प्रगतीसाठी कररूपी योगदान द्यावे.

- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभाग

कर संकलनासाठी १७ झोन

महापालिकेने कर संकलनासाठी १७ झोन केले आहेत. त्यातील वाकडमध्ये सर्वाधिक ४९ हजार ३६ नागरिकांनी ६८ कोटी रुपये आणि पिंपरीनगर झोनमध्ये सर्वांत कमी तीन हजार ९८२ मालमत्ताधारकांनी तीन कोटी रुपये कर भरला आहे. सर्वाधिक तीन लाख ११ हजार ६७ निवासी मालमत्ताधारकांनी तब्बल २६० कोटी रुपये कराचा भरणा केला आहे.

करसंकलनासाठी प्रयत्न

  • मिळकतकरावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली

  • मिळकतधारकांनी वैयक्तिक स्वरूपात एसएमएसद्वारे सवलतींबाबत कळवून कर भरण्याचे आवाहन

  • मिळकतकर सवलतींची माहिती व बिले वेळेवर मिळकतधारकांपर्यंत पोहोचले

करसवलत (टक्के)

  • महिलांच्या नावावरील मिळकती - ३०

  • सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प - ३

  • जागेवर कचरा निर्मूलन - ५

  • ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन - २

  • माजी सैनिक - १००

  • स्वातंत्र्य सैनिक - ५०

  • शून्य कचरा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग - ८

  • सौरऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शून्य कचरा - १०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT