पिंपरी-चिंचवड

वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले

CD

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २३ : येथील मारुती मंदिर चौकासमोर इमारतीवरील जाहिरातीचा बॅनर वादळी वाऱ्यामुळे फाटला. अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने धोकादायक लोखंडी सांगाडा काढा. या संदर्भात सोमवारी (ता. १३) ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र दहा दिवस उलटले तरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने अद्याप त्याची दखल घेतली नाही. दरम्यान या घटनेनंतर चार दिवसांनी पुन्हा वादळी वाऱ्यामुळे त्या लोखंडी सांगाड्याखालील वाळलेले लिंबाचे झाड कोसळले. सुदैवाने तेथील सिग्नलच्या खांबावर ते पडल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, झाड हटविण्याची दोन-तीन दिवस नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची वाट पाहिल्यानंतर येथील टपरीधारकांनी स्वतः पुढाकार घेऊन झाड काढले. या सांगाड्याखाली फुले, चहा तसेच कापड, गॅरेजची दुकाने व टपऱ्या आहेत. रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. सध्या अजूनही ढगाळ वातावरण असून, जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने येथील धोकादायक सांगाडा तसेच शहर परिसरातील सर्व अनधिकृत होर्डिंगचे सांगाडे काढावेत, अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

‘‘तळेगाव स्टेशन ते चाकण रोड लगत असलेले अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या मोहीमेस आजपासून सुरवात केली आहे. कोणी हस्तक्षेप केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे. तसेच येथून पुढे होर्डिंगसंदर्भात नगरपरिषदेची परवानगी घ्यावी लागेल.’’
- एन. के. पाटील, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

‘‘वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने आम्ही टपरीधारक व विविध दुकानदार बॅनरचा लोखंडी सांगाडा कधी कोसळेल या भीतीच्या सावटाखाली वावरत आहोत. हा सांगाडा लवकरात-लवकर काढावा.’’
- अमोल सावंत, टपरीधारक

PNE24U21394, PNE24U21395

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT