Rajesh Patil Sakal
पिंपरी-चिंचवड

प्लॅस्टिक बॉटल द्या; चहा प्या, वडापाव खा

तुम्हाला तहान लागली. जाता जाता एखाद्या दुकान किंवा रेस्टॉरंटमधून पाणी बॉटल अथवा शीतपेयाची बाटली घेतली. त्यातील पाणी अथवा शीतपेय पिऊन झाले.

सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला तहान लागली. जाता जाता एखाद्या दुकान किंवा रेस्टॉरंटमधून पाणी बॉटल अथवा शीतपेयाची बाटली घेतली. त्यातील पाणी अथवा शीतपेय पिऊन झाले.

पिंपरी - तुम्हाला तहान लागली. जाता जाता एखाद्या दुकान किंवा रेस्टॉरंटमधून पाणी बॉटल (Water Bottle) अथवा शीतपेयाची बाटली घेतली. त्यातील पाणी अथवा शीतपेय पिऊन झाले. त्यानंतर रिकामी प्लॅस्टिक बाटली फेकून देऊ नका. अशा पाच व दहा अथवा त्यापेक्षा अधिक बाटल्या जमवा आणि चहा विक्रेत्याकडून चहा (Tea) प्या! किंवा वडापाव विक्रेत्याकडून वडापाव (Vadapav) खा! हा अनोखा प्रोत्साहनपर उपक्रम स्वच्छ व प्लॅस्टिक मुक्त शहरासाठी महापालिकेने आणला आहे. त्याला प्रतिसाद देऊन स्वच्छतेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांसह विक्रेत्यांनाही प्रशासनाने केले आहे.

शहरातील रस्त्यांच्या कडेला, नदी, नाल्यांत वा घरोघरच्या आणि हॉटेल, रेस्टॉरंट, टपऱ्या, हातगाड्यांवरील गोळा होणाऱ्या कचऱ्यात पाण्याच्या (मिनरल वॉटर) व शीतपेयाच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. पर्यावरणाला हानी होते. त्यासाठी महापालिकेने प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्याचे ठरविले असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

विक्रेत्यांना आवाहन

कचरा वेचक अथवा अन्य नागरिकांनी पाणी व शीतपेयाच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करून त्या बदल्यात त्यांना चहा व नाश्ता स्वरुपात मोबदला देण्यासाठी शहरातील इच्छुक छोटे हॉटेल व्यावसायिक अथवा चपरी, हाथगाडीवाले किरकोळ विक्रेत्यांनी महापालिकेसमवेत काम करावे. संकलित केलेल्या प्लॅस्टिक बाटल्या महापालिकेकडे द्याव्यात. त्यांचे वजन करून चहा, नाश्ता अथवा जेवण यापोटी केलेल्या खर्चाची रक्कम दिली जाईल. इच्छुक व्यावसायिकांनी महापालिका मुख्यालयात आरोग्य विभाग, मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे संपर्क साधून अर्ज भरून द्यायचा आहे.

प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी छोटे हॉटेल व्यावसायिक व किरकोळ विक्रेते यांच्याकडून आलेल्या अर्जांची छाननी केली जाईल. विक्रेता व व्यावसायिकाने अधिकृत अन्न परवाना असणे आणि त्यांच्या हॉटेल व व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. असे असेल तरच त्यांना परवानगी दिली जाईल.

- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

उपक्रमाचे फायदे

- अनेकांना चहा व नाश्ता मिळेल

- विक्रेत्यांना एकरकमी रक्कम मिळेल

- शहर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल

- प्लॅस्टिकमुक्त शहर होऊ शकते

- रंगानुसार विलगीकरण करून बाटल्या मिळतील

- प्लॅस्टिक प्रक्रियेचा खर्च कमी येऊन मोबदला अधिक

असे आहेत दर

- पाच बाटल्यांच्या मोबदल्यात एक कप चहा मिळणार

- दहा बाटल्यांच्या मोबदल्यात एक वडापाव मिळणार

- एक चहासाठी विक्रेत्याला १० रुपये मिळतील

- एक वडापावसाठी विक्रेत्याला १५ रुपये मिळतील

दृष्टिक्षेपात उपक्रम

- एक वर्षासाठी साधारणतः २५ लाख रुपये खर्च अपेक्षित

- आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या नियंत्रणाखाली ३२ वॉर्डात उपक्रम राबविणार

दृष्टिक्षेपात चहा व वडापाव विक्रेते (अधिकृत)

- फक्त चहा - १५००

- फक्त वडापाव - ३०००

- चहा व वडापाव - ३२००

(संदर्भ - महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ)

(टीप - महापालिकेने २०१२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. तेव्हापासून आतापर्यंत व्यावसायिकांची संख्या दुप्पट झाली असल्याचा अंदाज आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT