Home esakal
पिंपरी-चिंचवड

पिंपळे निलखला एक कोटी किमतीच्या घरांची घरांची सर्वाधिक विक्री

पिंपरी-चिंचवड शहरात मामुर्डी, मोशी, चिखली, चोविसावाडी, बोऱ्हाडेवाडी, डुडूळगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व सांगवीसह पिंपळे निलख या भागात राहण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरात मामुर्डी, मोशी, चिखली, चोविसावाडी, बोऱ्हाडेवाडी, डुडूळगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व सांगवीसह पिंपळे निलख या भागात राहण्यासाठी सर्वाधिक मागणी आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad City) मामुर्डी, मोशी, चिखली, चोविसावाडी, बोऱ्हाडेवाडी, डुडूळगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व सांगवीसह पिंपळे निलख (Pimple Nilakh) या भागात राहण्यासाठी सर्वाधिक मागणी (Demand) आहे. मोठे रस्ते, वाहतूक कोंडीपासून दूर आणि नव्याने विकसित परिसर यामुळे या भागाला मोल आले आहे. २०१७ ते २०२१ या पाच वर्षाच्या कालावधीत ‘सीआरई मॅट्रिक्स’ व ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या अहवालावरुन (Report) या भागात प्रत्येकी एक कोटी किमतीची घरे (Home) सर्वाधिक विकली (Selling) गेली आहेत.

मामुर्डी हा भाग सुरुवातीला अविकसित असल्याने सदनिकांची मागणी नव्हती. मात्र, २०१९ मध्ये या भागात ९४७ घरे विक्रीचा ४०५ कोटींचा उच्चांक कोरोना काळातही गाठला आहे. २०१७ मध्ये अवघ्या १३५ घरांची विक्री ४९ कोटीला झाली आहे. तसेच, २०२१ मध्ये ८६१ इतकी घरे विकली गेली असून ३७५ कोटींचा नफा झाला आहे.

मोशी, चिखली आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात सलग काही वर्षांपासून मागणी चांगली राहिली आहे. २०१७ ते २०२१ पर्यंत सदनिका विक्री चांगली झाली. २०१९ मध्ये ५,७६१ सदनिकांची विक्री १,६७८ कोटींना आणि २०२१ मध्ये ४ हजार १२० सदनिकांची विक्री १ हजार ३१२ कोटींना झाली आहे. या भागात २५ ते ५० लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी कायमस्वरुपी आहे.

चोविसावाडी व चऱ्होली

२५ ते ५० लाखांच्या सदनिकांना मागणी आहे. २०२० मध्ये २,१८१ घरे विकली गेली असून ७२८ कोटींची उलाढाल झाली असून ती उच्चांकी आहे. त्याचबरोबर १,५२३ घरांची विक्री झाली असून ५५२ कोटींची घरे अवघ्या आठ महिन्यात विकली गेली आहेत.

डुडुळगाव

२०१७ पासून मागणी सर्वाधिक वाढत आहे. या भागात २५ ते ५० व ५० ते ७५ लाखांची घर विक्री होत आहे. २०१७ मध्ये ५४९ घरे विकली असून १३७ कोटींची उलाढाल झाली आहे. तर, २०१९ पासून ते २०२१ पर्यंत घरांच्या विक्रीचा आलेख वाढला आहे. २०२१ मध्ये या भागात सर्वाधिक १२०० घरे विकली व ३४९ रुपये कोटी उलाढाल झाली. तसेच, पिंपळे गुरव व सांगवी या भागात २०१७ पासून सर्वाधिक विक्री होत असे, मात्र २०२१ मध्ये एकदमच घटली आहे. या भागात रस्ते व मर्यादेपेक्षा रहिवास परिसरात वाढ ही यामागील कारणे आहेत. २०१८ मध्ये ६३६ घरांची विक्री झाली असून २४५ कोटींची उलाढाल झाली आहे. तर, २०२१ पासून २७७ घर विक्री १३३ कोटींची घट झाल्याचे दिसून आले आहे.

पिंपळे निलखमध्ये २०१७ मध्ये २५ ते ५० लाखांपर्यंतच्या ६२ कोटींच्या घरांची विक्री सर्वाधिक झाली आहे. कालांतराने यामध्ये बदल झाला. ५० ते ७५ लाखांच्या सदनिकांना महत्त्व आले. त्यानंतर, ७५ ते १०० लाखांच्या घरानंतर एक कोटी किंमत असलेल्या सदनिकांची मागणी वाढली. २०१७ पासून ९४ कोटी, त्यानंतर २०१८ मध्ये १७७ कोटी व २०१९ मध्ये १९६ कोटींच्या एकूण सदनिकांची विक्री झाली आहे. ती २०२१ मध्ये १६५ कोटी झाली आहे. या भागातील उच्चभ्रू किमतीच्या घरांच्या विक्रीचा ट्रेंड कायम आहे.

पिंपळे निलख या भागातील घरांची झालेली विक्री व उलाढाल :

वर्ष घरे एकूण किंमत (कोटी)

२०१७ ३५१ २३६

२०१८ ४३९ ३५३

२०१९ ३८३ ३३७

२०२० २७८ २४९

२०२१ ३११ २७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT