rte sakal media
पिंपरी-चिंचवड

RTE : तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने संकेतस्थळ बंद

आरटीई प्रवेशाला मिळेना ‘मुहूर्त’

CD

पिंपरी: आरटीईला दिलेल्या मुदतवाढीनुसार आजपासून (ता. १६) प्रवेश प्रक्रिया सुरू होणे आवश्‍यक होते. परंतु यावर्षीही प्रक्रियेला तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने संकेतस्थळ बंद आहे. परिणामी सकाळपासून प्रवेशासाठी खटपट करणाऱ्या पालकांच्या पदरी निराशा पडली आहे. या प्रक्रियेला गुरुवारपर्यंत (ता.१७) दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. दुपारी तीननंतर पालकांनी अर्ज करावा, अशी माहिती संकेतस्थळावर झळकत आहे.

आरटीईच्या संभाव्य वेळापत्रकानुसार एक फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होऊन पालकांना अर्ज भरण्यास सांगितले होते. परंतु शाळा नोंदणी रखडल्याचे कारण देऊन शिक्षण विभागाने १५ दिवसांची म्हणजेच १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानुसार पालकांनी बुधवारी सायबर कॅफेमध्ये सकाळीच धाव घेतली. पण संकेतस्थळ बंद दिसेल. दुपारनंतर आरटीईच्या संकेत स्थळावर प्रक्रिया गुरुवारी (ता. १७) सुरू होईल, अशी माहिती झळकू लागली. त्यामुळे आपोआपच ऑनलाइन अर्ज भरण्यास विलंब होणार आहे. याबाबत प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेमध्ये खूप गोंधळ होत आहे. निरनिराळ्या कारणांमुळे आरटीईच्या उद्देश साध्य होत नाही. त्यातच आता ‘तांत्रिक’ अडचणीमुळे पालकांना मोबाईलवर एमएमएस जात नाहीत. अर्ज करण्यासाठी पालकांनी प्रयत्न केल्यावर लॉगिन क्रिएटच होत नाही. संकेतस्थळावर ‘न्यू युजर’ म्हणून ऑप्शन असतो. तोही दिसत नसल्याचे पालकांनी सांगितले. ‘‘आरटीई ऑनलाइन प्रवेश २०२२-२३ साठी पालकांनी ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक १६ फेब्रुवारीपासून होत आहे.

गोंदिया जिल्हा दुपारी तीननंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीननंतर अर्ज भरू शकतील,’’ अशी माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. मात्र, दुसरीकडे ऑनलाइन अर्ज भरण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सरकारच्या या बेजबाबदार कारभारामुळे पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच पालकांनी रजा टाकली होती. वेळेचा अपव्यय व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पालक हैराण झाले आहेत. यापूर्वी एमएमएस न आलेल्या पालकांनी काय करावे? हा सर्व गोंधळ सर्वसामान्य पालकांना न समजणारा आहे. त्यामुळे त्वरित आरटीईबाबत सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी पालकांची मागणी जोर धरू लागली आहे.


‘‘शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक आरटीईबाबत दरवर्षी गोंधळ होत आहे. प्रत्येक वर्षी तांत्रिक गोंधळ होतोच कसा? हे न उलगडणारे कोडे आहे. पालकांनी किती दिवस हा त्रास सहन करायचा आहे. शिक्षण विभागाने निर्विघ्नपणे प्रक्रिया राबवावी.’’
- उमाकांत वाझे, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT