Pimpri Metro Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी ते फुगेवाडी अंतर ७.५ किलोमीटर; वेळ १० मिनिटे

बहुचर्चित पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) ऑनलाइन लोकार्पण झाले.

सकाळ वृत्तसेवा

बहुचर्चित पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) ऑनलाइन लोकार्पण झाले.

पिंपरी - बहुचर्चित पिंपरी (Pimpri) ते फुगेवाडी (Phugewadi) मेट्रोचे (Metro) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) ऑनलाइन (Online) लोकार्पण झाले. त्यानंतर महापालिका पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह काही नागरिकांनी पिंपरी ते फुगेवाडी आणि फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत प्रवास (Journey) केला. एका बाजूने साडेसात किलोमीटर अंतर जाण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ लागला. ताशी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने मेट्रो धावली.

पुण्यातील वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी अर्थात पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) अशा दोन मार्गिका आहेत. त्यातील गरवारे कॉलेज ते वनाज या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रत्यक्ष आणि पिंपरी-चिंचवडमधील पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गाचे रविवारी ऑनलाइन लोकार्पण झाले. या कार्यक्रमाची थेट चित्रण पाहण्याची व्यवस्था पीसीएमसी स्थानकावर केली होती. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन लोकार्पण केल्यानंतर पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो धावली. पीसीएमसी स्थानक व मेट्रोला फुलांच्या माळांनी सजवले होते. राष्ट्रगीताची धून लावली होती. उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

काचेला तडे नाहीत, डिझाईन

पीसीएमसी ते फुगेवाडी दरम्यान धावलेल्या मेट्रोच्या एक क्रमांकाच्या कोचच्या उजव्या बाजूकडील दोन खिडक्यांच्या काचांना तडे गेल्याचे आढळून आले. याबाबत काहींनी लोकप्रतिनिधी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण, त्या खिडक्यांच्या काचा तडकलेल्या नसून ती डिझाईन असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महिलांसाठी उद्या मोफत

महिला दिनानिमित्त मंगळवारी (ता. ८) दिवसभर महिलांना मेट्रोतून मोफत प्रवास सुविधा ठेवली जाणार आहे. मात्र, त्यांचे भाडे महापालिकेतर्फे मेट्रोला दिले जाईल. मंगळवारी पहिल्या गाडीत फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, कचरा वेचक महिलांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे महापालिका पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

कामगार कामांत गुंग

पीसीएमसी स्थानकावर मेट्रोच्या ऑनलाइन लोकार्पणाची तयारी सुरू असताना स्थानक व मेट्रो मार्ग उभारणारे कामगार त्यांच्या कामात गुंग होते. या स्थानकाच्या केवळ एकाच जिन्याचे काम पूर्ण झाले आहे. मोरवाडी व फिनोलेक्स कंपनीकडे उतरण्यासाठीच्या जिन्यांची कामे अर्धवट असून ती पूर्ण करण्याची कामगारांची लगबग दिसून आली

नॉनस्टॉप प्रवास

मेट्रोच्या पीसीएमसी ते फुगेवाडी स्थानकादरम्यान संत तुकारामनगर (वल्लभनगर), भोसरी (नाशिक फाटा) व कासारवाडी ही स्थानके आहेत. मात्र, या स्थानकांवर मेट्रो थांबलीच नाही. मात्र, या स्थानकांवर सुरक्षा कर्मचारी व पोलिस बंदोबस्त तैनात होता. काही उत्साही नागरिकही या स्थानकावर मेट्रो पाहण्यासाठी उपस्थित होते.

ट्रॅक बदलण्याची यंत्रणा

मेट्रोचे ‘अप’ व ‘डाऊन’ असे दोन ट्रॅक आहेत. एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर मेट्रो जाण्यासाठी पीसीएमसी व फुगेवाडी स्थानकाजवळ स्वयंचलित यंत्रणा आहे. पीसीएमसी स्थानकापासून अर्धा किलोमीटर पुढे एम्पायर इस्टेट पुलाजवळ मेट्रोचे कारशेड आहे. त्याच्या छताचे काम अंतिम टप्प्यात आहे. तिथे देखभाल-दुरुस्ती केली जाईल.

कोण काय म्हणाले...

नगरसेविका सीमा सावळे - महापालिकेने आजपर्यंत मेट्रोला २८७ कोटी रुपये दिले आहेत, तरीही शहराला दुय्यम वागणूक मिळत आहे. ‘पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो’ असे नाव हवे

नगरसेविका आशा शेंडगे - अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा परिसरात पीसीएमसी स्थानक असल्याने त्याचे नामकरण ‘अहिल्यादेवी होळकर पीसीएमसी मेट्रो स्थानक’ असे करावे

पक्षनेते नामदेव ढाके - मेट्रोच्या खिडक्यांना तडे गेले असल्यास मेट्रोकडे तक्रार करून खिडक्यांच्या काचा दुरुस्ती व अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली जाईल

अशी धावली मेट्रो

- पीसीएमसी स्थानकातून सकाळी ११.४८ वाजता निघून ११.५८ वाजता फुगेवाडी स्थानकात पोहोचली.

- फुगेवाडी स्थानकातून दुपारी १२.२० वाजता निघून पीसीएमसी स्थानकात १२.३० वाजता पोहोचली.

- ट्रेन ऑपरेटर शिवराज कोरे यांनी पीसीएमसी-फुगेवाडी-पीसीएमसी मार्गावर मेट्रोचे सारथ्य केले.

- पीसीएमसी व फुगेवाडी मेट्रो स्थानकांवर रोशन जैस्वाल यांनी हिरवी झेंडा दाखवली.

- ‘प्रवाशांसाठी दुपारी तीन वाजता मेट्रो सेवा सुरू होईल,’ अशी उद्घोषणा वैशाली मुंगळे यांनी पीसीएमसी स्थानकावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT