पिंपरी-चिंचवड

मतदार राजा जागा हो..

CD

उर्से,ता.३ : ‘मतदार राजा जागा हो, प्रगतीचा धागा हो’, ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वांचा सहभाग’, ‘एकच लक्ष मताचा हक्क’ अशा विविध घोषणा देत शनिवारी मतदार जनजागृती फेरी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ऊर्से जिल्हा परिषद प्राथमिक व पद्मावती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना मतदानाचे महत्त्व सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध घोषणांचे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेऊन शाळेच्या पटांगणापासून फेरीला सुरुवात केली. गावातील पद्मावती मंदिरातील प्रांगणात थांबून ग्रामस्थांना मतदानाविषयी शिक्षक संतोष भोसले यांनी मतदान का करावे ? या विषयी थोडक्यात माहिती देऊन शपथ दिली. लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान आवश्यक असून, लोकशाही अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी मतदानाचा मूलभूत हक्क नागरिकांनी बजावायलाच हवा, असे तलाठी विजय साळुंखे यांनी ग्रामस्थांना व विद्यार्थांना माहिती देताना सांगितले. कार्यक्रमास मंडल अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक व पोलिस पाटील गुलाब आंबेकर उपस्थित होते.


फोटो क्रमांक: BBD24B02794,95

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mains 2023 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; महेश घाटुळे परीक्षेत पहिला, मुलींमध्ये वैष्णवी बावस्कर अव्वल

2024 Pune car crash: पोर्शे कार अपघातानंतर केलेले कारनामे भोवणार; गुन्ह्यांत कलमवाढ! अल्पवयीन आरोपीचा पाय खोलात

'गुड टच अँड बॅड टच' ची कार्यशाळा सुरू होती, तरुणीनं असं काही सांगितलं की पोलिसांना बोलवावं लागलं, काय घडलं?

Kalyaninagar Accident प्रकरणी रक्ताचे नमुने बदलण्यात सहभाग असलेल्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जितिया सणादरम्यान मोठी दुर्घटना! 43 जणांचा बुडून मृत्यू, घटनेत 37 मुलांचा समावेश, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT