पिंपरी-चिंचवड

उन्हाळी भुईमूग घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

CD

इंदोरी, ता.११ ः पाण्याची मुबलकता आणि चांगला भाव यामुळे मावळ तालुक्यात उन्हाळी भुईमूग पीक घेण्याकडे शेतकरी हळूहळू वळू लागला आहे. सध्या तालुक्यात सुमारे २ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भुईमूग पीक घेतले जात आहे.
इंद्रायणी, पवना, आंद्रा व सुधा नद्यांमुळे मावळात बारा महिने मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र वाढले. त्यामुळे, शेतकरी नगदी पिकांकडे वळला. खरिपातील भुईमूग क्षेत्र सुमारे ९० टक्के कमी झाले. कडधान्ये तर हद्दपारच झाली आहेत. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, करडई पिकांबाबत ही हीच अवस्था झाली आहे. संत तुकाराम साखर कारखान्यामुळे ऊस क्षेत्र वाढल्याचा हा परिणाम दिसून येतो.
मावळात विशेषत: पूर्व भागात खरीप हंगामात सुमारे २ हजार हेक्टर क्षेत्रात भुईमूग पीक घेतले जायचे. परंतु, पावसाचा लहरीपणा व काढणीसाठी मजुरांचा तुटवडा यामुळे भुईमूग पिकाची जागा सोयाबीन पिकाने घेतली आहे. सध्या मावळात खरीप हंगामात केवळ सुमारे ३० हेक्टर क्षेत्रात भुईमूग पीक होते.
शेतकरी शंकर उबाळे, दिनेश चव्हाण म्हणाले,‘‘अत्याधुनिक यंत्रसामग्री व अवजारे यामुळे उन्हाळी भुईमूग घेणे सोयीचे व फायदेशीर झाले आहे.’’
शेतकरी सुदाम भसे, हरी भसे म्हणाले,‘‘अधिक उत्पादन देणाऱ्या वेस्टर्न ५५ व कस्तुरी १०८ या बियाणांच्या वाणास अधिक पसंती आहे. सुमारे १६० रुपये ते १९० रुपये किलो दर आहे. साधारण १ किलोमागे किमान १ पोते तरी उत्पादन मिळतेच.’’
शेतकरी श्रावण शिंदे म्हणाले,‘‘पूर्वी भुईमूग पिकासाठी सर्रास घरगुती बियाणांचा वापर व्हायचा. पण, अलीकडे घरगुती बियाणे नामशेष झाले आहे.’’

पाण्याची मुबलकता व मिळणारा चांगला भाव यामुळे शेतकरी हळूहळू उन्हाळी भुईमूग पीक घेण्याकडे वळला आहे. सध्या तालुक्यात सुमारे २ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भुईमूग पीक घेतले जात आहे.
- गणेश दाभाडे, इंद्रायणी कृषी सेवा केंद्र, इंदोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT