देहूरोड, ता. १३ : श्री क्षेत्र देहूची गायरान जमीन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयास देण्यास आज श्री संत तुकाराम महाराज संस्थान विश्वस्त आणि देहूतील नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून विरोध केला. ग्रामस्थांनीही सहभाग घेतला. ‘देहू बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देहूतील गट नंबर ९७ ही गायरानातील जमीन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयास देण्यास शासनाकडून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी तहसीलदार आणि प्रांत यांच्या नेतृत्वाखालील पथक आज मोजणीसाठी देहूत दाखल झाले होते.
सकाळी महाद्वार चौकात संस्थानचे विश्वस्त, नगरपंचायतीचे नगरसेवक आणि ग्रामस्थ जमा झाले होते. प्रथम पंचपदी व टाळ- मृदंगाच्या गजरात अभंग गायन झाले. नंतर ‘तुकाराम... तुकाराम’ गजरात भजनाच्या साथीने मोर्चा शांततेच्या मार्गाने १४ टाळकरी चौकातून प्राथमिक आरोग्य केंद्र मार्गे देहूच्या मुख्य कमानीपर्यंत आला.
या मोर्चात संस्थानचे अध्यक्ष भानुदासमहाराज मोरे, विश्वस्त विशाल मोरे, संतोष मोरे, अजित मोरे, भानुदास मोरे, संजय मोरे, माणिक मोरे, नगरपंचायतीचे गटनेते योगेश परंडवाल, नगरसेवक योगेश काळोखे, प्रवीण काळोखे, मयुर टिळेकर, मयुर शिवशरण, सुधीर काळोखे, रसिका काळोखे, ज्योती टिळेकर, पूजा दिवटे, अक्षदा हगवणे, गणेश हगवणे, मधुकर कंद, बाळासाहेब काळोखे, प्रा. विकास कंद आदी सहभागी झाले होते.
तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन
श्री क्षेत्र देहूची गायरान जमीन आयुक्तालयास देण्यास विरोधाच्या मागणीचे निवेदन संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायतीच्यावतीने तहसीलदार अर्चना निकम यांनी स्वीकारले. यावेळी प्रांत संजय आसवले, तलाठी एस. एल. काळे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक स्पृहा चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.
...यांनी केल्या भावना व्यक्त
गटनेते योगश परंडवाल : देहू परिसरात १९३९ मध्ये ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने स्थानिकांच्या जागा ताब्यात घेतल्या. देहू हद्दीत यापूर्वी लष्करानेही जागा संपादित केली. जे गायरान देहू डीपी प्लॅनसाठी लागणार आहे ते आयुक्तालयासाठी घेतले जात आहे. यास कायम विरोध राहील.
संस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे : आमचीच जागा आम्हाला मागावी लागत आहे. शासनाने देहू गायरानाबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करावा.
तहसीलदार अर्चना निकम : देहू संस्थान, देहू नगरपंचायत आणि ग्रामस्थांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. आजची गायरानाची मोजणी रद्द करत आहोत.
शैलेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते : गायरानात उद्यान व अन्य सुविधा नागरिकांनासाठी उपलब्ध करायच्या आहेत.
संस्थान विश्वस्त भानुदास मोरे : गायरान हे नगरपंचायत इमारत आणि राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने रुग्णालय व निवास व्यवस्था यासाठी लागणार आहे.
संस्थान विश्वस्त माणिकमहाराज मोरे : देहूत वर्षभरात तुकाराम बीज, संत तुकाराम पालखी सोहळा व अन्य सोहळ्याच्या निमित्ताने दहा ते पंधरा लाख भाविक येतात.
फोटो ओळ : देहू : dehuroad13002p1 : देहू,
प्रथम पंचपदी व टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गायन झाले.
dehuroad13002p2 :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.