Pimpri Chinchwad Crime - लोणावळ्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, दोन दिवसांत चोरीच्या पाच घटनांमध्ये एका दुचाकीसह लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. गवळीवाडा येथे एका घरासमोर उभी केलेली दुचाकी शनिवारी रात्री चोरट्याने लंपास केली.
शिवराज लहू गायकवाड (वय २३, रा. साई निवास, खोंडगेवाडी, लोणावळा) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत तुंगार्ली, लोणावळा येथील गोल्ड व्हॅलीतील दोन बंगल्यांमध्ये शनिवारी रात्री दोन बंगल्यांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये किमती ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
पहिल्या घटनेत गोल्ड व्हॅलीतील एमराल्ड सोसायटीमधील बंगला क्र.चारमध्ये बंगल्याच्या उघड्या दरवाज्यातून चोरट्याने रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास बंगल्यात प्रवेश करीत २१ हजार ५०० रुपयांची रोकड, किंमती घड्याळे असा ४४ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी गुलशन बिशनदास कुकरेजा (वय ६६, रा. गुरुग्राम, हरियाना) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
तर दुसऱ्या घटनेत रात्री साडेआठच्या सुमारास तुंगार्लीतील वॉटरफॉल सोसायटीमधील जलसा बंगल्यात चोरट्याने खिडकीतून बंगल्यात प्रवेश करत सोन्याची साखळी, चांदीची अंगठी, मोबाईल फोन,रोकड असा ६० हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी अमोल महादेव राठोड (वय ३०, रा. भाईंदरपाडा, घोडबंदर रोड ठाणे, मूळ राहणार बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील लोणावळा स्क्वेअर मॉलमधील वाहनतळात उभ्या केलेल्या स्वीफ्च मोटारीच्या काचा फोडत अज्ञात चोरट्यांनी मोटारीतून आयफोन, चार्जर, पॉवर बॅक व रोख रक्कम असा २३ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. याप्रकरणी प्रज्ञा शरद करगुटकर (वय ५९, रा. गोरेगाव प.,मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत एसटी स्टँडजवळ उभ्या करण्यात आलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही मोटारीची काच फोडत चोरट्याने मोटारीतील अँपल कंपनीचे लॅपटॉप, इतर साहित्य, बॅंकाचे क्रेडीट व डेबीट कार्ड असा दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
याप्रकरणी प्रणय विजयकुमार अगरवाल (वय ४०, रा. कांदरपाडा दहिसर प.,मुंबई) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. लोणावळा परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या वतीने गस्त वाढविण्याबरोबर चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.