पिंपरी-चिंचवड

श्री राम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पणनिमित्त जाधववाडीत धार्मिक उपक्रम

CD

मोशी, ता. १८ : हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान श्रीराम मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चिखली-जाधववाडी लिंक रस्ता येथे सुप्रसिद्ध कथाकार प्रेरणा बृजवाशी यांचे ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’ कथा वाचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २२) रोजी राम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी देशभरामध्ये उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने विविध आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. चिखली-जाधववाडी रामायण मैदान येथे १९ ते २५ जानेवारी असे सहा दिवस कथा वाचन होणार आहे.

‘‘प्रभू श्री राम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरामध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. प्रसिद्ध कथाकार प्रेरणा किशोरी बृजवाशी यांचा ‘श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या आध्यात्मिक सोहळ्याचे श्रवण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी उपस्थित राहावे.’’
- महेश लांडगे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Coaches in Trains : मध्ये रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मेल-एक्स्प्रेसना जोडले जाणार दोन जनरल डबे

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो १७ आणि १८ ऑक्टोबरला पाणी जपून वापरा; पालिकेकडून १०% पाणी कपात

Bomb Threats to Flights : विमानांच्या उड्डाणात धमक्यांचा अडथळा! गेल्या तीन दिवसांत बारा विमानांची उड्डाणे रद्द

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

SCROLL FOR NEXT