पिंपरी-चिंचवड

लसणाची आवक पुन्हा घटली; भावात १० टक्क्यांनी वाढ

CD

मोशी, ता. १० : येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये मागील आठवड्यापेक्षा लसणाची आवक १० टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळे, लसणाच्या भावात पुन्हा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लसणाचे भाव १०० ते १४० रुपयांवरून १५० ते २०० रुपयांवर गेले. लसूण वगळता पालेभाज्या, फळभाज्यांची आवक व भाव स्थिर राहिले. फळांना मागणी असल्याने आवकीत वाढ झाली.
मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये कोथिंबीर, मेथी, पालक आदी पालेभाज्यांची ४४ हजार जुड्या, फळभाज्या ३ हजार ४०९ क्विंटल तर १ हजार १४२ क्विंटल फळांची आवक झाली. उन्हाळ्यात मागणी असल्याने फळबाजारात फळांची आवक वाढली आहे. मात्र, भाव स्थिर आहेत.
फळभाज्यांमध्ये लसूण ५, कांदा ४५८, बटाटा ९७२, टोमॅटो ४९३, वटाणा ४३, फ्लॉवर ३४२, कोबी १७३, गाजर ११०, मिरची ९९, काकडी १४८, घेवडा ४६, लिंबू २९ आदी फळभाज्यांची एकूण आवक ३ हजार ४०९ क्विंटल झाली आहे. ही आवक स्थिर आहे. मात्र, कोबी, फ्लॉवरची आवक १० टक्क्यांनी कमी झाली असून पुन्हा भाव १० टक्क्यांनी वाढले आहेत. उर्वरीत फळभाज्यांचे भावही स्थिर आहेत.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून कोथिंबीर २१ हजार, मेथी ११ हजार ५००, शेपू १ हजार ९००, पालक ३ हजार ३००, कांदापात ४ हजार १००, पुदिना २ हजार ७००, मुळा ५०० आदी पालेभाज्यांची एकूण ४० हजार जुड्या इतकी आवक झाली. ही आवक स्थिर असून भावही स्थिर आहेत.
फळांमध्ये देवगड हापूस, रत्नागिरी हापूस आंबा, द्राक्षे, कलिंगड, सफरचंद, शहाळे, पपई, अननस, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी आदी फळांचीही १ हजार ४२ क्विंटल आवक झाली असून ही आवक २० टक्क्यांनी वाढली. मात्र, भाव स्थिर आहेत.

- बाजार भाव एक किलोचे (रुपयांमध्ये)
नवीन लसूण : १५० ते १८०
जुना लसूण : १८० ते २००
कांदे -
गोल्टा : १२ ते १५, चांगला : १८ ते २०
लहान : १० ते १२
बटाटे -
नवीन : १८ ते २०
जुना : २२ ते २५
लहान : १५ ते १८
आले : ५० ते ६०,
भेंडी : ४० ते ५०,
गवार : ८० ते ९०,
टोमॅटो : १५ ते २०,
वटाणा : ४० ते ५०,
घेवडा : ३० ते ४०, दोडका : ३० ते ४०, घोसाळे : ३० ते ४०,
मिरची -
काळी लवंगी : ६० ते ७०, ज्वाला : ५० ते ६०, मोठी लांब मिरची : ४० ते ५०,
ढोबळी : ३० ते ४०, भोपळा : दुधी : ३० ते ४० लाल : २५ ते ३०,
ढेमसे : ४० ते ५०,
परवर : ३० ते ४०,
भुईमूग : ५० ते ६०, काकडी : २० ते ३०, कारली : ३० ते ४०,
गाजर : ३० ते ४०,
पापडी : ३० ते ४०, पडवळ : ३० ते ४०,
परवर ३० ते ४०,
चवळी : ३० ते ३५,
तूर : ३० ते ४०,
फ्लॉवर : ३० ते ५०,
कोबी : ३० ते ५०,
वांगी : ४० ते ५०,
सुरण : ४० ते ५०,
तोंडली जाड : ३० ते ४०, तोंडली लहान : ४० ते ५०, बीट : ४० ते ४५,
कोहळा : ४० ते ४५, पावटा : ५० ते ६०,
वाल : ४० ते ५०, वालवर : ५० ते ६०, शेवगा : ८० ते १००, चवळी : ४० ते ५०,
कैरी : ५० ते ६०, मका कणीस : १५ ते २०,
लिंबू : १२० ते १५०

- बाजार भाव एका जुडीचा(रुपयांमध्ये)
कोथिंबीर : ७ ते १०,
मेथी : ७ ते १०
शेपू : ५ ते ७,
कांदापात : ८ ते १०, पालक : ५ ते ७,
मुळा : ८ ते १०,
चवळी : ८ ते १०,
करडई : ८ ते १०,
राजगिरा : ८ ते १०,
चाकवत : ८ ते १०,
अंबाडी : ८ ते १०,
पुदीना : ३ ते ५
लाल माठ : १० ते १२
आळू : १० ते १२
कढीपत्ता : ३५ ते ४०
हरभरा : ८ ते १०

बाजार भाव एका किलोचे (रुपयांमध्ये)
हापूस आंबा -
देवगड : ५ ते ६ हजार (५ डझनांची पेटी)
रत्नागिरी : ७ ते ८ हजार (६ डझनाची पेटी)
हिमाचल प्रदेश रॉयल, गाला, स्पर, रेड गोल्डन सफरचंद : १३० ते १४० रुपये किलो.
परदेशी : १२० ते १३०, पिअर : ११० ते १२०, किवी : ७० ते ८० एक बॉक्स,
हिरवी द्राक्षे : ४० ते ५०,
काळी द्राक्षे : ५० ते ६०,
मोसंबी : ६० ते ७०,
संत्री - परदेशी : ९० ते १००, महाराष्ट्र : ६० ते ७०,
कलिंगड : ४० ते ५०,
डाळींब : १२० ते १३०,
पेरु : ९० ते १००,
अंजीर : ८० ते १००,
पपई : ३० ते ४०,
खरबूज : ३० ते ४०,
चिकू : ५० ते ६०, सीताफळ : ६० ते ७०, केळी : ४० ते ५०, सोनकेळी : ९० ते १००, आलुबुकार : ८० ते ९०, शहाळे : ४० ते ५०, अननस : ३० ते ४०, आवळा : ५० ते ६०,
ड्रॅगन फ्रुट : ५० ते ६० रु.
ऊस : १०० मोळी.

MOS24B02679, MOS24B02680, MOS24B02681

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT