पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागर परिसर हिरवागार करण्याचा संकल्प

CD

पिंपळे सौदागर, ता. १० : वृक्ष लागवड व संवर्धन करणे ही काळाची गरज बनली असून, त्याअनुषंगाने येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोसायटी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याची सुरवात साई ऑर्चड सोसायटीपासून करण्यात आली.
सोसायटीमधील रहिवाशांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. सावली देणारी, फुलझाडे व शोभेच्या झाडांसह विविध प्रकाराच्या झाडांचे रोपण करण्यात आले. यातून परिसर हिरवा करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, सोसायटीचे चेअरमन राजकुमार शर्मा, सेक्रेटरी अमित कोरे, खजिनदार योगेश सामंत, नीलेश अग्रवाल, दत्तात्रेय बनसोडे, हरीमोहन तिवारी, विपुल जोशी, कपिल पंडिता, कल्पेश रमानी, रिना रमानी, सुहास सतर्के, स्मिता सतर्के, राधेश्याम अग्रवाल आदी उपस्थित होते.

कोट
वृक्ष लागवड व संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. अचानक हवामान बदलत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटा आणि पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होत आहे. पुढील पिढीला ही समस्या भेडसावू नये, या उद्देशाने सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेतला. यापुढेही परिसरात वृक्षारोपण मोहीम सुरूच राहणार आहे.
कुंदा भिसे, अध्यक्षा, उन्नती सोशल फाउंडेशन
………….


फोटोः 15913

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT