पिंपरी-चिंचवड

‘समाजात आदर्श निर्माण होणे काळाची गरज’

CD

पिंपरी, ता. ३ ः विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य समाजासमोर पोहोचले पाहिजे. त्यातूनच नव्या पिढीमध्ये काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा निर्माण होते. समाजात नवनवीन आदर्श निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांनी केले.
महाराष्ट्र दिन, कामगार दिन व जागतिक पुस्तक दिनाच्यानिमित्त शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने ‘राजर्षी शाहू गौरव पुरस्कार वितरण’ सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी राजेश हजारे, डॉ. जितेंद्र होले, शलाका कोंडावार, जयश्री घावटे, अनन्या पाटील, डॉ. सुनीता निकम व निलाक्षी काळे-सालके यांना राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, उद्योजक रोहिदास शिंदे, विलास जेऊरकर, राजाराम वंजारी, राजगोंडा पाटील, भरत गायकवाड, कैलास दुर्गे उपस्थित होते. प्रास्ताविक बालकिशन मुत्याल यांनी केले. राजेंद्र घावटे यांनी परिचय करून दिला. मनीषा पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पगारे यांनी सूत्रसंचालन केले. तर गणेश सहाणे यांनी आभार मानले.
राजाराम रायकर, गोपाळ सैंधाणे, अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रवींद्र अडसूळ, सोमनाथ कुयटे, बबनराव उंदरे यांनी यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT