पिंपरी-चिंचवड

शंकरवाडी-पिंपळे गुरव रस्त्यामुळे रहदारी होणार सुकर

CD

जुनी सांगवी, ता. ११ ः कासारवाडी शंकरवाडी (शंकर मंदिर) रस्ता व भुयारी मार्ग या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम गतीने करण्यात येत आहे. दोन टप्प्यात करण्यात येत असलेल्या या रस्त्याचे एका टप्प्याचे काम पूर्ण झालेले असून, गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील एका बाजूचे काम प्रगतिपथावर आहे. याच रस्त्यावरील शंकर मंदिर परिसरातील भुयारी मार्गाचे काम गतीने सुरू आहे. कासारवाडी शंकर मंदिर ते पिंपळे गुरव पुलापर्यंत हा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करून नूतनीकरण करण्यात येत असल्याने रहदारी सुकर होण्यास मदत होणार आहे.

जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपरी, भोसरीकडे ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याऐवेजी जवळचा मार्ग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा उपयोग करतात. पावसाळ्यात शंकर मंदिर परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या पावसात पाणी तुंबण्याच्या प्रकारांमुळे अनेकदा येथून रहदारीसाठी कसरत करावी लागायची. भुयारी मार्ग व रस्त्याचे काम झाल्यास येथील अडथळे दूर होतील, असे स्थापत्य विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहे रस्त्याचे काम
- शंकरवाडी शंकर मंदिर ते पिंपळे गुरव सृष्टी चौक पुलापर्यंत हा रस्ता जोडला जाणार
- साधारण २३ कोटी ३९ लक्ष ९७ हजार रू. रस्ता कामाचा खर्च असून कामाची मुदत नोव्हेंबर २०२५ पर्यंत आहे
- काही ठिकाणी १२ मीटर व १८ मीटर असे रस्त्याचे दोन टप्पे आहेत
- १२ मीटर रस्त्याचे एकूण अंतर ७०० मीटर असून १८ मीटर रस्त्याचे एकूण अंतर ८६० मीटर आहे
- रस्त्याच्या डाव्या बाजूस ३०० ते ४०० मी. व्यासाच्या सेवा वाहिन्या, पावसाळी पाणी वाहिन्या, जल:निस्सारण वाहिन्या, ड्रेनेज लाईन टाकण्यात आल्या आहेत.
- शंकरवाडी अंडरपास पर्यंतचा ३०० मीटर लांबीचा रस्ता उजव्या बाजूस पूर्ण झाला आहे. तर डाव्या बाजूचे काम दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे.
- रस्त्याच्या डाव्या बाजूला सायकल ट्रॅक, ग्रीनरी, पदपथ करण्यात येत आहेत.

‘‘मुख्य रस्त्याऐवेजी हा जवळचा मध्यवर्ती मार्ग असल्याने या रस्त्याचा नागरिक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. भुयारी मार्ग व सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यामुळे रहदारी सुलभ होईल. काम गतीने मुदतीत पूर्ण करावे.
- किरण पवार, नागरिक

‘‘पवना नदी किनारा व सखल भाग असल्याने पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी तुंबण्याच्या प्रकारांमुळे अडचणी येत होत्या. नवीन कामामुळे अडचणी येणार नाहीत ही अपेक्षा आहे.
- प्रदीप भोसले, नागरिक

‘‘काम गतीने सुरू असून एका टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याची अंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत.
- सुनील दांगडे, उपअभियंता, स्थापत्य विभाग, ‘ह’ प्रभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT