पिंपरी-चिंचवड

मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून ‘मीम स्पर्धा’

CD

पिंपरी, ता. ८ ः मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका करसंकलन विभागाने ‘मी थकबाकीदार’ या मीम स्पर्धेचे आयोजन केले आहे. तिला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दोन टप्प्यात ही स्पर्धा होणार असून, अंतिम तीन विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
महापालिकेने मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. थकबाकीदारांना नोटीस देऊन मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू आहे. तरीही काही जण थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यांना कर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मीम स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतली जात आहे.

काय आहे ‘मीम’
हसत-खेळत, चिमटे काढत व्यक्तीच्या वर्मावर बोट ठेवण्याच्या कलाकृतीला ‘मीम’ म्हटले जाते. सध्या ‘मीम’ झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. एखाद्या व्यवसायापासून चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीठी मीमचा वापर होत आहे.

स्पर्धेचे विषय
- मालमत्ता कर थकबाकीदारांना कर भरण्यास प्रोत्साहित करणे
- थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्याचे महत्त्व पटवून देणे
- कर न भरल्याने दरमहा लागू होणाऱ्या व्याजामुळे होणारे नुकसान पटवून देणे
- मालमत्ता कर भरत नसल्याबाबत अपराधीपणाची भावना निर्माण करणे

स्पर्धेचा कालावधी
पहिला टप्पा ः ६ ते १३ फेब्रुवारी
दुसरा टप्पा ः २१ ते २८ फेब्रुवारी

विजेत्यांना पारितोषिक
प्रथम ः पाच हजार
द्वितीय ः तीन हजार
तृतीय ः दोन हजार

उदाहरणादाखल ‘मीम’
मराठी चित्रपट बनवाबनवीमधील नायक व नायिकेमधील संवादाचा आधार घेत...
नायिका ः कशी मुलगी हवीये तुम्हाला?
नायक ः कशी म्हंजे, दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण, महापालिका मालमत्ता कर थकबाकीदाराची नको.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT