Home purchase esakal
पिंपरी-चिंचवड

Home Purchase : पाडव्याच्या मुहूर्तावर गृहखरेदीची ‘गुढी’

‘एका दिवसात आमच्या चारशे सदनिका बुक झाल्या’, ‘घरांना मागणी वाढली आहे, शॉर्टेज पडतात की काय, अशी स्थिती आहे’, ‘दोन, अडीच व तीन बीएचके प्लॅटला अधिक मागणी आहे.'

पीतांबर लोहार

‘एका दिवसात आमच्या चारशे सदनिका बुक झाल्या’, ‘घरांना मागणी वाढली आहे, शॉर्टेज पडतात की काय, अशी स्थिती आहे’, ‘दोन, अडीच व तीन बीएचके प्लॅटला अधिक मागणी आहे.'

पिंपरी - ‘एका दिवसात आमच्या चारशे सदनिका बुक झाल्या’, ‘घरांना मागणी वाढली आहे, शॉर्टेज पडतात की काय, अशी स्थिती आहे’, ‘दोन, अडीच व तीन बीएचके प्लॅटला अधिक मागणी आहे,’ हे शब्द आहेत, शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील बांधकाम क्षेत्राचा आढावा घेतला असता गेल्या तीन वर्षांच्या कोरोनाचा काळा काळ संपून बाजारपेठेत ‘तेजी’ आल्याचे चित्र दिसले. स्वप्नातील घराच्या पूर्तीसाठी घर खरेदीला (बुकिंग वा गृहप्रवेश) चैत्र अर्थात गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून स्वप्नपूर्तीची गुढी उभारल्याचा आनंद नागरिकांच्या बोलण्यातून जाणवला.

स्वतःच घर असावे, असं प्रत्येकाचं स्वप्न असते. पण, घरांच्या परवडणाऱ्या किंमती आणि मनासारखा परिसर व गृहप्रकल्प यावर सर्व गणित अवलंबून असते. कोरोनाचा काळोखा काळ संपल्याने ते गणित सुटल्याचे दिसते आहे. घरांच्या शोधात असलेल्या नागरिकांचा स्वप्नातील घर घेण्याकडे कल वाढला आहे. सध्या चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, ताळवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डी आदी भागात मोठमोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. तेथील बांधकामांचा दर्जा उत्तम असून किंमतीही परवडणाऱ्या असल्याने आपापल्या सोयीनुसार व पसंतीनुसार घरांचे बुकिंग नागरिकांकडून केले जात आहे. त्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्तही अनेकांनी साधला आहे.

दृष्टिक्षेप

- दोन, अडीच, तीन बीएचके सदनिकांना मागणी

- चिखली, मोशी, चऱ्होली, रावेत, किवळेला पसंती

- कनेक्टिव्हीटी, बांधकाम क्वॉलिटीला प्राधान्य

- बजेटमधील घरांचे बुकींग करून स्वप्नपूर्ती

- भाडेतत्त्वावरील घरापेक्षा स्वतःच्या घरांना प्राधान्य

- २५ लाखांपासून ७५ लाखांपर्यंत सदनिकांच्या किंमती

- त्वरीत बुकिंग, त्वरीत ॲग्रीमेंटची सुविधा

नागरिक म्हणतात...

गेल्या तीस वर्षांपासून आम्ही काळेवाडीत राहतो. तीन मुली व एक मुलगा आहे. चारही मुलांना उच्च शिक्षण दिले. मुलींचे विवाह केले आहेत. मुलगा नोकरी करतोय. पती रिक्षा चालवतात. मी गृहिणी असून स्वयंसेवी संस्थेतर्फे गरीब मुलांसाठी काम करते. कष्टात दिवस काढले. एवढ्या मोठ्या शहरात आपल्या घरासाठी एक विट तरी घेऊ की नाही, अशी शंका मनात होती. ती आता राहिली नाही. कुदळवाडीत स्वतःचे घर बुक केले आहे. लवकरच ताबा मिळून स्वप्नातील घरात राहायला जाण्याचा आनंद आणखी द्विगुणित होईल.

- सुनंदा हरणे, गृहिणी, काळेवाडी

मी आधी मुंबईत होतो. गेल्या वर्षी कंपनीने पुण्यात बदली केली. कंपनी बाणेरला आहे. सध्या राहायला आळंदीत आहे. भाडेतत्त्‍वावरील फ्लॅट आहे. पत्नी, आई-वडील एकत्र कुटुंब आहे. पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा भाडेतत्त्वार घर घेण्यासाठी खूप फिरावे लागले. त्यामुळे स्वतःचे घर होईल की नाही, याची शाश्वती नव्हती. शिवाय, घरमालकांच्या अटी-शर्ती पाहून स्वतःचे घर असलेले बरे असेही वाटायचे. अनेक भागातील बांधकाम प्रकल्प पाहिल्यानंतर मोशीतील घर पसंत पडले आणि वडिलांच्या सल्ल्याने बुक केले.

- पुरुषोत्तम हिवाळे, आयटी अभियंता, आळंदी

बांधकाम व्यावसायिक म्हणतात...

घरांसाठी चांगले दिवस आले आहेत. नागरिकांकडून मागणी वाढली आहे. आमचे गेल्या दहा महिन्यांत २७० सदनिकांचे बुकिंग व सर्वांचे करारनामेही झाले आहेत. गुढीपाडव्याचा विचार करता गेल्या दहा दिवसांत ४५ सदनिदांचे बुकिंग होऊन करारनामेही झाले आहेत. अनेक जण उद्या येणार आहेत. दोन, अडीच, तीन बीएचके फ्लॅटला अधिक मागणी आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमुळे कंपनीजवळ घर असावे, या उद्देशाने आणि मोशी, चिखली परिसरातील सोयी-सुविधा, चांगल्या दर्जाची बांधकामे यामुळे घरांना पसंती आहे.

- संतोष बारणे, संचालक, सिल्व्हर ग्रुप, चिखली-मोशी

घर घेण्यासाठी नागरिकांकडून प्रतिसाद चांगला आहे. आमचे एका दिवसांत चारशे फ्लॅट बुक झाले आहेत. भाडेतत्त्वार राहणाऱ्या नागरिकांना आता स्वतःचे घर हवे आहे. बांधकाम क्षेत्रात तेजीचे वातावरण आहे. शिवाय, घरांच्या किंमतीही वाजवी आहेत. नागरिकांच्या आवाक्यातील व त्यांना परवडणारी घरे मोशी, डुडुळगाव परिसरात उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटी, सोयी-सुविधांबरोबरच बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता पाहून लोक घरांचे बुकिंग करतात. स्वतःच्या घराचा शोध घेणाऱ्यांच्या स्वप्नांची पूर्तता होत आहे.

- सुभाष साकोरे, संचालक, मंगलम् ग्रुप, मोशी

ग्राहक सध्या चोखंदळ झाला आहे. त्यांना चांगल्या दर्जाच्या व सुख-सुविधा असलेल्या घरांच्या शोधात ग्राहक असतात. त्यांच्या पसंतीला उतरणारी व त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणाऱ्या घरांची निर्मिती आम्ही केली आहे. त्यांना चांगली सेवा दिली जात आहे. थ्री बीएचके लक्झरी फ्लॅट असावा, असे अनेकांचे उद्दिष्ट असते. त्याची पूर्तता आम्ही केली आहे. त्यामुळे थोडे स्लो असले तरी प्रतिसाद चांगला आहे. दर्जेदार सेवा देण्यावर आमचा भर आहे. रावेत परिसरात चांगल्या घरांचा शोध घेऊन नागरिक बुकिंग करत आहेत.

- लक्ष्मण म्हेत्रे, संचालक, एलएस मेहेत्रे प्रोमोटर्स ॲंड बिल्डर्स, रावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT