पिंपरी-चिंचवड

व्हेरॉक चषक क्रिकेटमध्ये डेक्कन जिमखाना संघाचा विजय

CD

पिंपरी, ता.३ ः ‘पीसीएमसीज्’ व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट ॲकेडमीमार्फत, थेरगाव येथे आयोजित १४ वर्षांखालील मुलांच्या ‘व्हेरॉक चषक’ क्रिकेट स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाने ३ गडी राखून विजय मिळविला.
ॲकेडमीच्या मैदानावर वरील साखळी सामना झाला. ट्रिनिटी क्रिकेट ॲकेडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रतिस्पर्धी डेक्कन जिमाखाना संघाच्या भेदक माऱ्यापुढे संघाचा डाव साफ कोसळला. आर्य कुमावत आणि नील सावंत (प्रत्येकी ३ बळी) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. आर्य कुमावत याने अष्टपैलू खेळ केला. आर्य कुमावत हा सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक पुढील प्रमाणे -
ट्रिनिटी क्रिकेट ॲकेडमी ः ३४.२ षटकांत सर्वबाद १०१ - राजवीर तावरे २३ (नील सावंत ३/१८, आर्य कुमावत ३/१९, युवराज मोरे २/८) पराभूत वि. डेक्कन जिमखाना ः ३५ षटकांत ७ बाद १०२ - आर्य कुमावत ३३, ओम मालुसरे २७ (निहार नील ३/२१, विश्वजीत जगताप २/१९)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT