पिंपरी-चिंचवड

रस्त्यांची दुरुस्ती करा, खड्डे बुजवा

CD

पिंपरी,  ता. १० ः रस्त्यांची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत, उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड करावा, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशा सूचना व तक्रारी नागरिकांनी महापालिकेतर्फे आयोजित जनसंवाद सभेत केल्या.
नागरिक आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद राखावा, तक्रारींचे निवारण जलदगतीने व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभांचे आयोजन केले जाते. आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी सभा झाल्या. त्यात ७९ नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारी व सूचना मांडल्या.
अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २१, ११, ३, ३, १२, ७, ११ आणि ११ नागरिकांनी सहभाग घेतला. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे, मनोज सेठिया, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर सभांचे मुख्य समन्वय अधिकारी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाल्या.

नागरिकांच्या तक्रारी
ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त कराव्यात, रस्त्यांची दुरुस्ती करावी, जुने सार्वजनिक शौचालयांची पुनर्उभारणी करावी,  उद्यानातील मोडकळीस आलेली झाडे, झाडांच्या फांद्या छाटाव्यात. उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसवावीत. ओपन जिममधील साहित्य दुरुस्त करावे, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड करावा, अनधिकृत बांधकाम व पत्राशेडवर कारवाई करावी, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा. उद्यानात धूम्रपान, रस्त्यांवर किंवा इतरत्र अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अतिक्रमणांवर कारवाई करावी, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पथारीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, शहर परिसरात वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी अशा सूचना व तक्रारी नागरिकांनी केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT