पिंपरी-चिंचवड

सोन्या तापकीर खूनप्रकरणी सूत्रधारासह तिघांना अटक भारत- नेपाळ सीमेवर भर पावसात थरारक पाठलाग

CD

पिंपरी, ता. ३ : चिखली येथील सोन्या तापकीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भारत-नेपाळ सीमेवरून अटक केली. मुसळधार पावसात शेतात पळालेल्या आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
करण रतन रोकडे (वय २५, रा. चिखली), ऋत्विक ऊर्फ मुंग्या रतन रोकडे, रिंकू दिनेश कुमार (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथे २२ मे रोजी दोघांनी सोन्या तापकीरचा गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना पकडले. मात्र, मुख्य सूत्रधार करण रोकडे फरार होता. त्याच्या मागावर पोलिस पथके होती. गुंडा विरोधी पथकाला आरोपींचा ठावठिकाणा लागला. मुख्य आरोपी करण रोकडे, त्याचा लहान भाऊ आणि अन्य दोघेजण भारत नेपाळ सीमेवरील एका गावात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मऊ जिल्ह्यातील मधुबन गावात सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून शेतात पळ काढला. भर पावसात गुंडा विरोधी पथकाने शेतात पाठलाग करून चौघांना पकडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT