Ajit Pawar esakal
पिंपरी-चिंचवड

Ajit Pawar: सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांना क्लीन चिट नाही; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने वाढवलं पवारांचं टेन्शन

‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार भारतीय जनता पक्षात आले नाहीत, तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार भारतीय जनता पक्षात आले नाहीत, तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला आहे. सिंचन घोटाळ्यातून कोणताही ‘क्लीन चीट’ अजित पवार यांना देण्यात आली नसून, त्याबाबत चौकशी चालू आहे,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश संघटन सरचिटणीस व आमदार श्रीकांत भारतीय यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केले.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना भारतीय म्हणाले, ‘घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा अजेंडा असेल तर, तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते. अजित पवार राज्यातील सत्तेत सामील होत असताना सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.

त्याचबरोबर नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचे ठरते. याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित, हेच ध्येय होते.’’

...तेच इकडे आले - भारतीय

२०१४ ते २०१९ च्या सरकारने केलेल्या कामगिरीवर निवडणुकीत जनतेने कौल दिला होता. २०१९ ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्त्वाचे सरकार नव्हते. त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले व तसेच सरकार सत्तेत आले आहे. आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही. तेच इकडे आले आहेत, असेही भारतीय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT