पिंपरी-चिंचवड

संगीत अकादमीला ‘सूर’ गवसणार

CD

अश्विनी पवार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १७ ः शहरातील स्थानिक कलाकारांना संगीताचे शिक्षण मिळावे व त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे, यासाठी सुरू केलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या मुख्यालयाचा चेहरा मोहरा लवकरच बदलणार आहे. निगडीतील संत तुकाराम व्यापारी संकुल येथील संगीत अकादमीच्या मुख्यालयाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. महापालिकेच्या स्थापत्य क्रीडा विभागाच्या वतीने होणाऱ्या नूतनीकरणासाठी तीन कोटी एवढा खर्च येणार आहे. नूतनीकरणामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आधुनिक संगीत कक्षाबरोबरच इतर सोयीदेखील प्राप्त होणार आहेत.

काय बदल होणार
- अकादमीच्या चिंचवड, संभाजीनगर येथे शाखा
- निगडीतील टिळक चौकातील संत तुकाराम व्यापारी संकुल येथे अकादमीचे मुख्यालय
- या ठिकाणी शास्त्रीय गायन, सुगम गायन, तबला हार्मोनिअम असे एकूण चार विभाग
- प्रत्येक विभागाच्या वर्गाचे नूतनीकरण सध्या सुरू
- प्रत्येक कक्षात आधुनिक साउंडसिस्टिम बसविण्यात येणार
- सभागृहाचाही कायापालट होणार
- कार्यक्रमासाठी अत्याधुनिक स्टेज, साऊंड सिस्टिमबरोबरच साऊंड बॅरिअर देखील बसविण्यात येणार
- संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक पुस्तके दिले जाणार
- संगीताचे संगणकावर धडे घेण्यासाठी ऑडिओ लायब्ररी देखील साकारणार
- अकादमीला संगीत क्षेत्रातील मान्यवर भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार
- पाहुण्यांसाठी ग्रीन रूम उभारणार
- संगीत अकादमीचे नामकरण भारतरत्न पंडित भीमसेन जोशी असे केल्याने मुख्यालयात पंडितजींचे शिल्प उभारणार

सद्यःस्थिती
- संगीत अकादमीतील तिन्ही केंद्रांमध्ये मिळून साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी संगीताचे धडे घेतात
- सर्वांत जास्त म्हणजे अडीचशे विद्यार्थी निगडीतील व्यापारी संकुल येथील मुख्यालयात संगीताचे शिक्षण घेतात
- आठ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांपासून ते ७२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश
- केंद्राचे मध्यवर्ती ठिकाण, येण्या-जाण्यासाठी असलेली वाहनांची सोय यामुळे येथे संगीताचे धडे घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांची संख्या वाढतेय
- वास्तू जुनी झाल्याने गेल्या काही वर्षांपासून हे मुख्यालय बदलाच्या प्रतीक्षेत
- नूतनीकरणामुळे संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार

‘महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेले नूतनीकरणाचे काम पुढील काही महिन्यांत पूर्ण होईल. नवीन सुविधांमुळे इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.’
- मनोज लोणकर, उपायुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

़‘‘या अकादमीच्या संपूर्ण मजल्याचे नूतनीकरण आम्ही करीत आहोत. येथे सध्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असल्याने टप्प्याटप्यात काम करण्यात येत असून, वर्षाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल.
- मनोज सेठिया, सहशहर अभियंता, स्थापत्य-क्रीडा विभाग

नवीन केंद्र सुरू करण्याची मागणी
सध्या संगीत अकादमीची तीन केंद्रे शहरात आहेत. मात्र, शहराची वाढणारी लोकसंख्या पाहता शहरातील सांगवी, पिंपळे सौदागर, पुनावळे या भागात नवीन केंद्र सुरू करावीत, अशी मागणी या भागातील स्थानिकांकडून केली जात आहे. मात्र, त्यासाठी पुरेशी शिक्षकसंख्या नसल्याने सध्या नवीन केंद्रांबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT