पिंपरी-चिंचवड

डॉ. महेश कुदळे

CD

दर्जेदार रुग्णसेवेचा वसा

पुणे शहर परिसरातील सर्वोत्तम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपैकी एक म्हणून रावेत येथील ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे ओळखले जाते. पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यासह इतर जिल्हे आणि राज्यांमधील हजारो रुग्णांनी आत्तापर्यंत ‘ओजस’च्या दर्जेदार रुग्णसेवेचा लाभ घेतला आहे. हे हॉस्पिटल ‘एनएबीएच’ (NABH) प्रमाणित आहे.
- डॉ. महेश कुदळे, BAMS, फॅमिली फिजिशियन

रा वेत येथे सुमारे ७५ खाटांचे ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉ. महेश कुदळे (BAMS, फॅमिली फिजिशियन) हे हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश जाधवर, डॉ. सचिन हुंडेकरी, डॉ. गौतम जुगल, डॉ. एस.के.टोके, डॉ.सुहास कथुरिया, डॉ. निरंजन पाठक, डॉ.पुष्कर गलाम, डॉ. निखिल जिल्लावार यांचे त्यांना बहुमोल सहकार्य लाभत आहे.
या हॉस्पिटलखेरीज, त्यांच्याशी संलग्न असलेले ‘हरितत्व’ आयुर्वेदिक सेंटर, देहूरोड येथे डॉ. महेश कुदळे यांच्या क्लिनिकसह आधार हॉस्पिटल, जीवनरेखा हॉस्पिटल, भक्तीसिद्धांत हॉस्पिटल, यमुनानगर, निगडी हे रुग्णांच्या सेवेत आहेत. याशिवाय, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहकार्याने, पीपीपी तत्त्वावर ‘ओजस’ आयसीयू हॉस्पिटल कार्यरत आहे.
ओजस हॉस्पिटलमध्येच ‘हरितत्व’ आयुर्वेदिक सेंटर कार्यरत आहे. यात, ॲलोपॅथीप्रमाणे, नाक, कान, घसा (इएनटी), कर्करोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, पोटाचे विकार, पायाच्या नसा फुगणे, केस गळणे, आदी विविध आजारांवरील अकरा तज्ज्ञ डॉक्टर इथे रुग्णाच्या सेवेत आहेत. हे सर्व आयुर्वेदिक स्पेशालिस्ट एम. डी. कन्सल्टंट डॉक्टर आहेत. या सर्वांना त्यांच्या क्षेत्राचा जवळपास १५ ते २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. वेगवेगळ्या आजारांचे इतके अनुभवी स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी आयुर्वेदिक सेवा देणारे हे पहिलेच सेंटर आहे. इथे गरजेनुसार रुग्णांना दाखलही करून घेण्याची सुविधा आहे. अर्धांगवायू (पॅरालेसिस) यावरही चांगले उपचार केले जातात. वजन कमी करण्यावरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. गर्भ संस्कार, सुवर्ण प्राशन संस्कार, पंचकर्म, वमन, विरेचन, मसाज, स्वेदनपेटी आदी उपचार इथे रुग्णांना दिले जातात. ओजस हॉस्पिटलमध्ये, आधुनिक सोयी-सुविधायुक्त चार शस्त्रक्रिया कक्ष आणि चौदा खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यरत आहे. जनरल ॲण्ड लॅप्रोस्कोपिक सर्जरी, स्त्रीरोग, प्रसूती, त्वचारोग, मेंदूविकार, बालरोग, कर्करोग, पोटाचे विकार, अस्थिरोग, सांधेरोपण, फुफ्फूसरोग, हृदयविकार, मधुमेह आदी रोग आणि आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात. चौदा खाटांचे अत्याधुनिक ‘आयसीयू’ इथे कार्यरत आहे. याशिवाय, मुदतपूर्व प्रसूतीमध्ये जन्मलेल्या नवजात अर्भकांसाठी सात खाटांची इथे व्यवस्था आहे. सर्व रोगांच्या निदान व तपासण्या हॉस्पिटलमध्येच करण्याची सुविधा आहेत. याखेरीज, क्लिनिकल रिसर्च सेंटर असून इथे विविध प्रकारचे संशोधन केले जाते. ‘सिटी स्कॅन’, ‘एक्स-रे’, ‘२-डी स्ट्रेस टेस्ट’, ‘सोनोग्राफी’ आणि ‘पॅथॉलॉजी’ लॅब इथे कार्यरत असून रुग्णांसाठी उपहारगृहाचीही सोय आहे.
‘ओजस’ने गोरगरीब रुग्णांसाठी देहूरोड येथे कॅन्टोमेंटचा ‘आयसीयू’ पीपीपी तत्त्वावर चालविण्यास घेतले आहे. इथे रुग्णांकडून केंद्र सरकार मान्यताप्राप्त दर आकारले जातात. हे ‘आयसीयू’ सात खाटांचे आहे. कार्डिॲक ऍम्बुलन्सही इथे रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असते. याशिवाय, देहूरोड येथेच आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चोवीस तास कार्यरत आहे. हृदयविकार, आर्थ्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, मधुमेह, अस्थमा, बालरोग आदींवर इथे यशस्वी उपचार केले जातात. डीलक्स रूम, जनरल वॉर्ड, प्रायव्हेट रूम (नॉन एसी) इथे रुग्णांसाठी उपलब्ध असून ‘ओजस’,‘आधार’ हॉस्पिटल्समध्ये सर्व प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सुविधा उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT