पिंपरी-चिंचवड

करिअर मार्गदर्शन, सन्मान अन् विद्यार्थ्यांचे स्वागत

CD

करिअर मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, पारितोषिक वितरण आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचे विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. दहावीनंतर काय? याबाबतच्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.

चापेकर विद्यालय, केशवनगर
दहावीचा टप्पा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची शाखा, विषय यांची निवड करावी. त्याबरोबरच कष्ट आणि जिद्दीने परिश्रम करण्याची तयारी ठेवली तर यशाच्या राजमार्गावर यशस्वी घोडदौड करता येईल, असा कानमंत्र करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टतर्फे (पीसीईटी) महापालिकेच्या केशवनगर चिंचवड येथील चापेकर माध्यमिक विद्यालयात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. एस. बी. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वडजे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एन. पाटील, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्लेसमेंट अधिकारी प्रा. स्वप्नील सोनकांबळे, चाफेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास चपटे आदी उपस्थित होते. दहावीनंतर करिअर कसे व कोणते निवडावे? याचे मार्गदर्शन करणारे वेलणकर यांनी लिहिलेले ‘दहावीनंतरची शाखा निवड’ हे पुस्तक भेट दिले. चापेकर शाळेचा दहावीचा निकाल ९४.२१ टक्के लागला आहे. महापालिका बक्षीस योजनेत शाळेतील निलेशकुमार पांडे, लालचंद बोईनवाड, पवन साळवे, सायली जगताप, अमिना शेख, प्रज्ञा नखाते हे विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे बक्षीस मिळाले. रामेश्वर पवार यांनी सूत्रसंचालन केले. लक्ष्मी कर्डिले यांनी आभार मानले.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ झाला. आदिवासी विकास विभाग वसतिगृह अधीक्षक उदय महाजन, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, शाहीर आसराम कसबे, समिती सदस्य राहुल बनगोंडे आदी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. नृत्यमय गणेशवंदना सादर केली. पोवाड्याच्या माध्यमातून गुरुकुलमची माहिती दिली. गायत्री अवघडे या विद्यार्थिनीने हार्मोनिअमवर भजन सादर केले. राजश्री तांबे या विद्यार्थिनीने तबल्यावर तीन ताल वाजवला. सूरज बनसोडे आणि त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी गायलेले ‘कचरा फेकू नका उघड्यावर...’ हे स्वच्छतेचा संदेश देणारे गीत उपस्थितांना भावले. ‘करू या प्रणाम...’ या समूहगीताने सांस्कृतिक सत्राचा समारोप झाला. शाळा प्रवेशोत्सवमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षिकांनी प्रत्येकाच्या कपाळावर कुंकू तिलक, औक्षण करून केले. शालेय साहित्य भेट दिले. सतीश अवचार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. स्वप्ना झिरंगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रधानाचार्या पूनम गुजर यांनी आभार मानले. कबीराचे दोहे आणि शांतिमंत्राच्या सामुदायिक सादरीकरणाने सांगता झाली.

फोटो ः ४९४३८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT